आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

235 अंक उसळून सेन्सेक्स पुन्हा 65 हजार अंकाच्या पार:जगभरातील खरेदी, चांगल्या संकेतांमुळे उभारी

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील बाजारातील कल सोमवारी मुंबई शेअर बाजारातही दिसून आला. सेन्सेक्स २३५ अंकाच्या उसळीसह पुन्हा एकदा ६१ हजारांच्या पार गेला. तो ६१,१८५ अंकांवर बंद झाला.

निफ्टीत ८६ अंकांची वाढ होत तो १८,२०३वर बंद झाला. दुपारी दीड वाजेपर्यंत सेन्सेक्स २३६ अंक घसरून ६०,७१४ पर्यंत खाली आला होता. मात्र बँक, ऑटो, धातू, ऊर्जा आणि ऑटो शेअर्सच्या खरेदीत वाढ झाल्याने दोन तासांच्या व्यवहारात ४७१ अंकांची उसळी मारली. तज्ज्ञांच्या मते, स्पष्ट दिशा शोधण्यासाठी धडपडत असलेले देशांतर्गत शेअर बाजार अखेर वाढीसह बंद झाले. पीएसयू बँका, ऑटो आणि मेटल समभागातील वाढीमुळे फार्मा समभागातील तोटा भरून काढला गेला. पीएसयू बँकांच्या समभागांनी गेल्या दोन तासांत नोंदवलेल्या नफ्याचे नेतृत्व केले. सार्वजनिक क्षेत्रातील बड्या बँकांचे तिमाही निकाल चांगले आले आहेत. याशिवाय अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वधारत असल्याचे मिळालेले संकेत आणि विदेशी गुंतवणुकीचा वाढलेला प्रवाह या बाबी पण शेअर बाजाराच्या उसळीला कारणीभूत ठरल्याचे व्यावसायिकांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...