आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय सकारात्मक कल आणि परदेशी गुंतवणूक वाढल्याने भारतीय शेअर बाजारात सलग ८ व्या दिवशी गुरुवारी तेजी दिसून आली. सेन्सेक्स 185 अंक वधारून 63,284 च्या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. तत्पूर्वी, सेन्सेक्सने 63,300 ची पातळी ओलांडली होती. निफ्टीसुद्धा 54 अंकांच्या वाढीसह 18,812 या उच्चांकावर बंद झाला.
एक्स्पर्ट व्ह्यू एस. रंगनाथन, रिसर्च हेड, एलकेपी सिक्युरिटीज
दोन वर्षांत मोठ्या कंपन्यांकडून लहान कंपन्यांचे अधिग्रहण, म्हणून शेअर मजबूत शेअर बाजारातील तेजीचे तज्ज्ञांना आश्चर्य वाटत नाही, त्यांच्या मते हे होणारच होते. कारण जागतिक अन् घरगुती बाजारातील संकेत पूर्वीपेक्षा जास्त सकारात्मक आहेत. त्याची ५ प्रमुख कारणे...
1. गेल्या दोन वर्षांत मोठ्या कंपन्यांनी बिगर सूचिबद्ध लहान कंपन्यांचे माेठ्या प्रमाणात अधिग्रहण केले आहे. कोरोनाकाळात अधिग्रहणाचे प्रमाण खूप होते. त्यामुळे मोठ्या कंपन्यांची ग्राहकांची व्याप्ती अधिक वाढून मजबूत झाली आहे. त्यामुळे त्यांच्या समभागांच्या दरामध्ये सातत्याने वाढ होतेय. 2. प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत भारतीय कंपन्यांची ‘एनर्जी कॉस्ट’ (कोळसा,वीज,गॅस) खूप घटली आहे. त्यामुळे नफ्यातही वाढ झाली आहे. 3. परदेशी गुंतवणूकदारांची नोव्हेंबर महिन्यापासून गुंतवणूक सातत्याने वाढली आहे. त्यामुळेच गेल्या महिनाभरात एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण होत असताना भारतीय बाजार 2-3% वाढले आहेत. 4. भारतात महागाईत वाढ होऊनही खरेदी आणि पर्यटन क्षेत्रात घट दिसली नाही. म्हणजे देशांतर्गत आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे हे संकेत आहेत. 5. जुलै-सप्टेंबर तिमाहीत धातू वगळता इतर सर्व क्षेत्रांतील कंपन्यांचे तिमाही निकाल उत्तम आहेत. त्यांच्या बॅलन्सशीटकडे आता गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. एक सल्ला... मूल्यांकनाकडे कानाडोळा करू नये, खबरदारी घेतली पाहिजे... व्याज दरवाढीचे सत्र लवकरच थांबू शकते. कच्च्या तेलाचे दरही कमी होत आहेत. त्यामुळे निकटच्या काळात शेअर बाजारातील जोखमीचे प्रमाणही कमी दिसते आहे. कारण कंपन्यांची आर्थिक स्थिती मजबूत राहील,असेच दिसून येते. परंतु योग्य मूल्यांकन व मूल्यमापन करूनच शेअर खरेदी केल्यास ते योग्य राहील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.