आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजी कायम:रिलायन्स, बँकांच्या जोरावर तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी, सेन्सेक्स 1,148 अंक तर निफ्टीत 326 अंकवाढ

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुक्रवारच्या घसरणीतून सेन्सेक्स-निफ्टी बाहेर

रिलायन्स आणि बँक शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे देशातील शेअर बाजारात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी वाढ पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स १,१४७.७६ अंक (२.२८%) वाढीसह ५१,००० वर जाऊन ५१,४४४.६५ वर बंद झाले. एनएसई निफ्टीत ३२६.५० अंकांची (२.१९%) वाढ राहिली. हा १५,००० पार होऊन १५,२४५.६० वर बंद झाला. जाणकारांनुसार, या वर्षात सेन्सेक्सच्या एका दिवसातील तिसरी, तर आतापर्यंतची बारावी सर्वात मोठी वाढ आहे. व्यवसायादरम्यान सेन्सेक्सने १,२४३ अंकांची उसळी घेत ५१,५३९.८९ आणि निफ्टीने ३५४.०५ अंकाच्या उसळीसह १५,२७३.१५ ची दिवसातील उंचीला स्पर्श केला. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि बँक शेअर्सच्या नेतृत्वाखाली निघालेल्या खरेदीने निर्देशांकांना दोन टक्क्यांहून जास्त वाढीसह बंद होण्यात जास्त योगदान दिले. ऑटो वगळता एनएसईच्या सर्व प्रमुख क्षेत्रीय इंडेक्स ०.६६ ते ३.३४ टक्के वाढीसह बंद झाले. निफ्टी पीएसयू आणि मेटल इंडेक्स ३ टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह बंद झाले. निफ्टी बँक, फायनान्शियल सर्व्हिसेस, खासगी बँक, रिअल्टी आणि आयटी इंडेक्समध्ये १.५० ते २.८८ टक्क्यांपर्यंत तेजी दिसली.

अमेरिकी बाजारांतील घसरणीनंतरही आशियातील बाजारांत तेजी दिसली. दुसरीकडे, दुपारी उघडलेल्या युरोपच्या बाजारात बळकटी दिसली होती. सेन्सेक्सच्या ३० पैकी २७ शेअर्स वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सच्या या वर्षातील टॉप-५ उच्चांक
तारीख अंक बंद स्तर
19 जानेवारी 834 49398
1 फेब्रुवारी 2315 48601
2 फेब्रुवारी 1197 49798
24 फेब्रुवारी 1030 50782
3 मार्च 1148 51445

शुक्रवारच्या घसरणीतून सेन्सेक्स-निफ्टी बाहेर
तीन दिवसांत सेन्सेक्स २,३४४.६६ अंकांची (४.७८%) वाढ आली आहे. निफ्टी ७१६.४५ (४.९३%) बळकट झाला आहे. गेल्या शुक्रवारी यामध्ये अनुक्रमे १,९३९ आणि ५६८ अंकांची घसरण झाली होती. गेल्या नऊ महिन्यांत एका दिवसातील याची सर्वात मोठी घसरण होती.

या तीन कारणांमुळे उसळी
1. जीडीपी सकारात्मक झोनमध्ये आल्यासोबत अन्य क्षेत्रातही सुधारणा दिसत आहे.
2. जागतिक पातळीवर बाँड यील्डमध्ये आलेली तेजी थांबत आहे. आता यात स्थैर्य दिसत आहे.
3. मोठ्या घसरणीनंतर ज्यामुळे तेजी येत आहे.

विक्रमी स्तर प्राप्त करू शकतो सेन्सेक्स-निफ्टी
देशातील बाजारासाठी बुधवार एक व्यग्र दिवस राहिला. शेअरमध्ये सर्व क्षेत्रात खरेदी निघणे म्हणजे निफ्टी, सेन्सेक्ससाठी अनुक्रमे १५,४३२ आणि ५२,५१७ चा विक्रमी स्तर प्राप्त करण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. - श्रीकांत चौहान, ईव्हीपी, टेक्निकल रिसर्च, कोटक सिक्युरिटीज

बातम्या आणखी आहेत...