आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • SFIO Arrests Mastermind I Indian Employees Were In Touch Through Chinese UP I Latest News And Update I

चीन संबंधित 33 शेल कंपन्यांवर कारवाईचा बडगा:SFIO ने केली मास्टरमाइंडला अटक; चिनी अपद्वारे भारतीय कर्मचारी संपर्कात होते

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसला (SFIO) चीनशी निगडीत 33 शेल कंपन्यांविरूद्ध फसवणूकीच्या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या तपासात एसएफआयओने गेल्या आठवड्यात तीन शेल कंपन्यांवर छापे टाकून एका जणाला अटकही केली आहे. याबाबत मंत्रालयाने रविवारी माहिती दिली.

गुरुग्राम, बंगळुरू, हैदराबादेतील तीन कंपन्यावर छापा

मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, 8 सप्टेंबर रोजी गुरुग्राम, बेंगळुरू आणि हैदराबाद येथील तीन कंपन्यांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईत एका दोषीला अटक देखील करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेली व्यक्ती भारतातील चिनी संबंधित असलेल्याशेल कंपन्यांचा समावेश असलेल्या रॅकेटचा मास्टरमाईंड आहे. या कंपन्यांच्या बोर्डवर बनावट संचालक मंडळ बनविणे, आदी प्रकारचे आरोप आहेत.

गुरुग्रामची कंपनी हाँगकाँगमधील NTT ची उपकंपनी
मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले की, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने स्वत:ची ओळख हिमाचल प्रदेशातील मंडी येथील रहिवासी असल्याचे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (आरओसी) कडे नोंदवलेल्या नोंदीनुसार दिले होते. आरओसी दिल्लीने केलेल्या चौकशी आणि छाप्यांमध्ये सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे. गुरूग्रामस्थित जिलियन कन्सल्टंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने डमी संचालकांना पैसे दिले होते. ही गुरुग्राम स्थित कंपनी हाँगकाँग स्थित NTT जिलियन कंपनीची उपकंपनी आहे. बेंगळुरूच्या फिनिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि हैदराबादच्या हुसिस कन्सल्टिंग लिमिटेडवरही छापे टाकण्यात आले.

शेल कंपन्यांमुळे देशाची आर्थिक सुरक्षा धोक्यात
मंत्रालयाने आरोप केला आहे की, कंपनीचे सील आणि डमी संचालकांच्या डिजिटल स्वाक्षरी असलेले बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. चिनी इन्स्टंट मेसेजिंग अ‌ॅपद्वारे भारतीय कर्मचारी चिनी समकक्षांच्या संपर्कात होते. देशाच्या आर्थिक सुरक्षेला मारक ठरणाऱ्या गंभीर आर्थिक गुन्ह्यांमध्ये या शेल कंपन्यांचा सहभाग असल्याचे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे.

9 सप्टेंबरला SFIO कडे 33 कंपन्यांची चौकशी सोपविली
9 सप्टेंबर रोजी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने गुरुग्रामस्थित कंपनी आणि इतर 32 कंपन्यांची चौकशी करण्याचे काम एसएफआयओकडे सोपवले होते. मंत्रालयाने सांगितले की, शनिवारी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. त्यास न्यायालयात हजर केले असता त्यांच्या ट्रान्झिट रिमांडचे आदेश प्राप्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...