आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआतापर्यंत कार्यालये वा बंदिस्त कॅम्पसमध्येच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर होत होता. देशातील मोठ्या बांधकाम कंपन्या प्रकल्पाची गुणवत्ता आणि दक्षतेत आणखी सुधारणा करण्यासाठी वेगाने एआयचा वापर वाढवत आहेत. सध्या हे प्राथमिक स्तरावर आहे, मात्र या तंत्रामुळे साधनांचा अपव्यय रोखणे, चोरी कमी करणे, साइट्सचे ट्रॅकिंग आणि कामगारांची सुरक्षा वाढवण्यासाठी प्रचंड मदत मिळत आहे.
देशात बंधारे, रस्ते, इमारती आदींच्या निर्मितीत अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे टाटा प्रोजेक्ट्स आणि एलअँडटी सारख्या कंपन्यांनी वेस्टेज रोखण्यासाठी आणि साधनांच्या उत्तम वापरासाठी नव तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. एलअँडटीने प्लॉट््स आणि बांधकाम साइट्सवर कामगारांच्या कामावर नजर ठेवण्यासाठी इमेज आणि व्हिडिओ अॅनॉलिटिक्सचा वापर सुरू केला आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘देशभरात अडीच लाख कर्मचारी आता डिजिटल रूपाने जोडले गेले आहेत. लॉकडाउनमध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचणे आणि मदत करण्यासाठी खूप मदत मिळाली. ७०-७५ टक्के प्रकल्पांत एआयशी निगडीत साधनांचा वापर करत होत आहे. सिमेंट मिक्सर गाड्यांमधून माल उतरवण्यात आणि परतण्यात गती आली आहे. कामगारांनी जॅकेट, हेल्मेटसारखी सुरक्षा साधने परिधान केली आहेत का, हे पाहणे एआय कॅमेऱ्यांमुळे सोपे झाले आहे. हे कॅमेरे यासाठी कॉम्प्यूटर व्हिजन टेक्नॉलॉजीचा वापर करत आहेत.’ कंपन्यांना असे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देणाऱ्या स्टाक नामक एआय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल राय यांनी सांगितले की, ‘त्यांनी टाटा प्रोजेक्ट्सला एआय सॉफ्टवेयर जार्विस दिले आहे. ते गाड्या तसेच रॉ मटेरिअलची ने-आण ट्रॅक करते. एलअँडटी कंपनीही ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन (एएनपीआर) आणि व्हिकल डिटेक्शन मॉडेल्सचा वापर करत आहे.
तंत्रज्ञानामुळे व्यवसाय वाढीसाठी हातभार
विप्रो इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंगचे ऑटोमेशन सोल्यूशन्स हेड जी. सुंदररमन म्हणाले, अनेक कंपन्या अजून एआय/मशीन लर्निंगचा पूर्णपणे वापर करत नाहीत. मात्र त्यात रुची वाढली आहे. छोटी कंपन्यांच्याही लक्षात आले आहे की, रिमोट व्हिजिबिलीटी, रिमोट कंट्रोलमुळे व्यवसाय वाढीसाठी मदत मिळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.