आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Shah Rukh Khan Byjus Ads | How Much Aryan Khan Father ShahRukh Fees For Advertisement

शाहरुखला झटका:शाहरुख खानवर आधारित सर्व जाहिराती BYJU'S ने थांबवल्या, प्री-बुकिंग असतानाही रिलीज होऊ दिली नाही जाहिरात

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर शाहरुख खानच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफवर मोठा फटका बसला आहे. ऑनलाइन लर्निंग ॲप BYJU'S (बायजूस) ने शाहरुख खानवर आधारित असलेल्या आपल्या सर्व जाहिराती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे, तर ज्या जाहिरातींचे शाहरुखसोबत बुकिंग झाले होते त्या देखील रिलीज करणार नाही असा निर्णय कंपनीने घेतला आहे.

शाहरुखला कोट्यधींचे नुकसान
शाहरुखच्या सर्वात मोठ्या स्पॉन्सर्ड डील्सपैकी बायजूस एक होता. या ब्रँडिंगच्या माध्यमातून शाहरुखला वार्षिक 3 ते 4 कोटी रुपये मिळत होते. 2017 पासूनच तो या ब्रँडचा चेहरा होता. या व्यतिरिक्त शाहरुख खानकडे ICICI बँक, रिलायन्स जिओ, एलजी, दुबई टूरिज्म, ह्युंदे यासारखे इतर 40 मोठे ब्रँड आहेत.

शाहरुख खान बायजूस ॲपमध्ये लोकांना आपल्या मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी आणि ट्युशनसाठी बायजूस किती महत्वाचे आहे याचे सल्ले देत असतो. परंतु, शाहरुखच्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अटक झाली. तेव्हापासून सोशल मीडियावर अभिनेत्याला ट्रोल केले जात आहे. यामध्ये अभिनेत्यासह त्याने एंडोर्स केलेल्या ब्रँड्सला सुद्धा लक्ष्य केले जात आहे. अशात ब्रँड्सला नकारात्मक प्रसिद्धीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच लहान मुलांच्या अभ्यासासाठी असलेले बायजूस शाहरुखचा चेहरा वापरून काय संदेश देत आहे? असा सवाल केला जात आहे.

बायजू रविंद्रन यांचे एडुटेक स्टार्टअप बायजूस डेकाकॉर्न क्लबमध्ये सामिल आहे. या कंपनीची ब्रँड व्हॅल्यू 10 अब्ज अमेरिकन डॉलर आहे. त्यामुळेच याला डेकाकॉर्न म्हटले जाते. कुठल्याही ब्रँडसाठी हे विशेषण मिळवणे खूप सन्मानजनक आहे. सिलिकॉन व्हॅलीच्या गुंतवणूकदार एनालिस्ट मेरी मीकर्स यांच्या कंपनीने बायजूसध्ये गुंतवणूक केली आहे. 10.5 अब्ज डॉलर अर्थात 79,409 कोटी हा खूप मोठा आकडा आहे. अशात शाहरुखच्या कुप्रसिद्धीवरून कंपनीला धोका पत्कारणे महागात पडू शकते.

बातम्या आणखी आहेत...