आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Share Maerket | Paytm Worsens Market Conditions; The Biggest Fall In Seven Months, The Bears Have Tightened Their Grip On The Stock Market

गुंतवणूकदार त्रस्त:पेटीएममुळे बिघडली बाजाराची प्रकृती; सात महिन्यांतील सर्वात माेठी घसरण, मंदीवाल्यांची शेअर बाजारावर पकड झाली घट्ट

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वात मोठ्या आयपीओ पेटीएममधील गुंतवणूकदारांच्या दुरवस्थेमुळे बाजारातील बिघडलेल्या मानसिकतेचा गुंतवणूकदारांवर परिणाम झाला आहे. देशातील शेअर बाजारात सोमवारी वर्षातील तिसरी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स १,१७०.१२ अंकांनी घसरून ५८,४६५.८९ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टी ३४८.२५ अंकांनी घसरून १७,४१६.५५ वर बंद झाला. दुपारनंतर बाजारात विक्रीचा दबाव इतका वाढला होता की सेन्सेक्स १,६२४ अंकांनी घसरून ५८,०१२ पातळीवर आला. पण कामकाजाच्या शेवटच्या सत्रात दूरसंचार आणि धातू समभागांची खरेदी झाल्यामुळे बाजार काहीसा सावरला.

विश्लेषकांच्या मते, गेल्या आठवड्याच्या अखेरीस घडलेल्या घडामाेडींमुळे मंदीवाल्यांना बाजारात आपली पकड मजबूत करण्याची संधी मिळाली. गेल्या आठवड्यात, देशातील सर्वात मोठ्या पेटीएमची बाजारात कमकुवत नाेंदणी झाली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या आगामी अधिवेशनात कृषीविषयक तीन कायदे मागे घेण्याची घोषणा केली. तयाचा परिणाम झाला

चांगले समभाग घ्या
गेल्या दोन वर्षात ज्या शेअर्समध्ये हालचाल झालेली नाही आणि येणाऱ्या काळात त्यात तेजी येण्याची शक्यता आहे असे शेअर्स घ्या -विनोद नायर, जिओजित फायनान्शियल.

अस्थिरता कायम राहील
गुरुवार ही मासिक वायदे व्यवहारांची शेवटची तारीख आहे. अशा स्थितीत या आठवड्यात अस्थिरता येण्याची शक्यता आहे. निफ्टी ५० चा एक वर्ष फॉरवर्ड पीई २०-२१ आहे. हा तीन वर्षातील १७-१८ सरासरीपेक्षा जास्त आहे.

या तीन कारणांमुळे झाली घसरण
1. पेटीएमची खराब नाेंदणी : कोरोना महामारीनंतर आलेल्या तेजीमुळे अनेक छोटे गुंतवणूकदार बाजारात आले. पण पेटीएमच्या कमकुवत नाेंदणीमुळे किरकोळ ओघ कमी होण्याची भीती आहे.

2. विदेशी गुंतवणूकदार संस्थांची विक्री : मॉर्गन स्टॅनलेनेभारताचा आऊटलूक घटवून ताे न्यूट्रल वा अंडरपरफाॅर्मन्स केला आहे. त्यामुळे बाजारात विक्रीचा दबाव वाढला.

सेन्सेक्स
1,170
58,465

निफ्टी348
17,417

बातम्या आणखी आहेत...