आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
१९८६ मध्ये ५४९ अंकांनी सुरू झालेला देशातील पहिला इक्विटी इंडेक्स सेन्सेक्स ३५ व्या वर्षी गुरुवारी ५० हजारांचा जादुई आकडा गाठत ४९,६२४ वर बंद झाला. अशा प्रकारे सेन्सेक्स ब्राझीलच्या आयबोवेस्पानंतर ५० हजारांचा टप्पा गाठणारा दुसरा बेंचमार्क इक्विटी इंडेक्स ठरला. त्याला १,००० पासून १० हजार गाठण्यास २० वर्षे लागली होती. तर, १० ते ५० हजार होण्यास १५ हून कमी वर्षे लागली. २००१ मध्ये सेन्सेक्समध्ये कंपन्यांचे मार्केट कॅप फक्त ५.२३ लाख कोटी होते. आता १९६.५१ लाख कोटी आहे. म्हणजे १९१.२८ लाख कोटी रु. वाढले.
प्रारंभी होते फक्त ५८ हजार रिटेल गुंतवणूकदार
१९७७ मध्ये प्रथमच बीएसई इंडेक्समध्ये धीरूभाई अंबानी यांनी रिटेल गुंतवणूकदारांना संधी दिली. ५८ हजार रिटेल गंुतवणूकदार होते. आता ४.४५ कोटी झाले. यातील १ कोटी गंुतवणूकदार मार्चनंतर गेल्या ९ महिन्यांत वाढले आहेत.
सेन्सेक्स ज्या ३० कंपन्यांसह सुरू झाला त्यातील ६ अजूनही निर्देशांकात आहेत
> रिलायन्स इंडस्ट्रीज
> महिंद्रा अँड महिंद्रा
> नेस्ले इंडिया
> लार्सन अँड टुब्रो
> आयटीसी
> हिंदुस्तान युनिलिव्हर
सेन्सेटिव्ह इंडेक्स असा झाला ‘सेन्सेक्स’
१९८९ मध्ये एका व्यापारविषयक मासिकात स्तंभ लिहिणारे स्टॉक अॅनालिस्ट दीपक मोहानी यांनी हा शब्द प्रचलित केला. सेन्सेटिव्ह इंडेक्सचे हे संक्षिप्त नाव होते.
तेल अन् गॅसचा दबदबा होता, आता खासगी बँकांचा
१० वर्षांपूर्वी सेन्सेक्समध्ये तेल आणि गॅस क्षेत्राचा १५% वाटा होता. आता खासगी बँकांचा वाटा २७.३४% आहे. १८.४६% आयटी आणि १२.२२% तेल व गॅसचा आहे. यात ११.५३% वेटेज केवळ रिलायन्स इंडस्ट्रीचे आहे.
आता पुढे केंद्रीय बजेटवर ठरेल दिशा अन् दशा
फेब्रुवारीमध्ये केंद्र सरकार अर्थसंकल्प सादर करणार आहे. तज्ञांनुसार, जर अर्थसंकल्प बाजाराच्या अपेक्षेनुसार असेल तर १०% ग्रोथ शक्य. सध्या रिटेल गुंतवणूकदारांनी एकदम मोठी रक्कम गुंतवणे टाळले पाहिजे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.