आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Share Market | Marathi News | Energy Stocks Beat Healthcare Backwards; Sensex Gained 676 Points

शेअर बाजा:ऊर्जा समभागांनी मारली बाजी, हेल्थकेअर पिछाडीवर; तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 676 अंकांनी वधारला

भोपाळ / मुकुल शास्त्रीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

२०२० च्या सुरुवातीस साथीच्या रोगाचा उद्रेक झाल्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. पण २०२१ बद्दल सांगायचे ततर, गेल्या वर्षी बाजारात त्यापेक्षा खूप वेगाने वाढ झाली. बीएसईच्या १९ क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे तर, २०२० मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा आरोग्यसेवा निर्देशांक २०२१ मध्ये मागे पडला. दुसऱ्या बाजूला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा माहिती तंत्रज्ञान निर्देशांक २०२१ मध्ये ५६ % पेक्षा थोडासा समान राहिला. तर ऊर्जा निर्देशांक सर्वात चांगली कामगिरी करणारा म्हणून उदयास आला. त्यात सर्वाधिक ६९% वाढ झाली. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, २०२० मध्ये कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर फार्मा स्टॉकमध्ये प्रचंड वाढ झाली होती. यामुळे त्या वर्षी आरोग्यसेवा निर्देशांकात सर्वाधिक ६१.४५% वाढ झाली. हा एकमेव निर्देशांक होता ज्याने ६० % पेक्षा जास्त वाढ नोंदवली. परंतु कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाने वेग घेतल्याने आरोग्य सेवा निर्देशांकाच्या वाढीचा वेग मंदावला. २०२१ मध्ये आराेग्यसेवा निर्देशांक फक्त २१% वर बंद झाला. २०२१ ची खास गोष्ट म्हणजे बीएसईच्या १९ पैकी पाच निर्देशांक ६० % पेक्षा जास्त वाढीसह बंद झाले. ऊर्जा निर्देशांकात सर्वाधिक ६९% वाढ झाली.. त्यानंतर औद्योगिक (६६.६२%), धातू (६६%), उपयाेगिता (६४.३८%) आणि मूलभूत साहित्य (६१.५३%) यांच्यात ६० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली.

२०२० मध्ये, बीएसईच्या १९ पैकी १६ सकारात्मक आणि तीन नकारात्मक पातळीवर बंद झाले. २०२१मध्ये चांगली गोष्ट म्हणजे सर्व १९ निर्देशांक सकारात्मक पातळीवर बंद झाले. गेल्या वर्षी एफएमसीजी निर्देशांक कामगिरीच्या बाबतीत तळाला होता. त्यात केवळ ९.३२ % वाढ नोंदवली गेली. जियोजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की ऊर्जा समभागांची कामगिरी मागे पडण्याची अनेक कारणे आहेत. २०२० मध्ये लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे विजेची मागणी झपाट्याने कमी झाली होती. परंतु २०२१ मध्ये, औद्योगिक घडामाेडींमध्ये वाढ झाल्यामुळे, विजेची मागणी झपाट्याने वाढली. सरकारने ऊर्जा क्षेत्रात सुधारणा केल्या. नवीकरणीय उर्जेवर लक्ष केंद्रित केले आहे. रिलायन्स, अदानी टाटा यांसारखे मोठे औद्योगिक समूह ग्रीन एनर्जीमध्ये गुंतवणूक करणार आहेत.

तिसऱ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स ६७३ अंकांनी वधारला
मंुबई| देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजीची कमान कायम राहिली सेन्सेक्स ६७२.७१ अंकांनी वाढून ५९,८५५.९३ वर बंद झाला. निफ्टीही १७९.५५ अंकांच्या उसळीसह १७,८०५.२५ वर बंद झाला. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जागतिक स्तरावर सकारात्मक कल बघून चौफेर खरेद झाल्याने बाजार भक्कम झाला.

बातम्या आणखी आहेत...