आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:अमेरिकेतील दरवाढीचा बाजारावरील परिणाम कायम, सेन्सेक्स 51,181.99 पातळीवर उघडला

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या वतीने करण्यात आलेल्या दरवाढीमुळे भारतीय शेअर बाजारात सुरू असलेली घसरण अद्याप थांबलेली नाही. भारतीय शेअर बाजारात आठवड्यातील व्यवहाराच्या अखेरच्या दिवशीही घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स शुक्रवारी 51,181.99 या पातळीवर उघडला.

गुरुवारी झालेल्या व्यवहाराच्या अखेर सेन्सेक्स घसरणीसह 51,495.79 या पातळीवर बंद झाला होता. शुक्रवारी यामध्ये आणखी घसरण झाली असून सेन्सेक्स 51,181.99 या पातळीवर उघडला. तर काही वेळातच यामध्ये आणखी घसरण नोंदवण्यात आली. सकाळी 09:32 सेन्सेक्स -519.8 अंकाच्या म्हणजेच -1.01% घसरणीसह 50,975.99 या पातळीवर व्यवहार करत होता.

बातम्या आणखी आहेत...