आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Sensex Fell 84 Points To Close At 56975; Nifty Fell 33 Points, The Biggest Decline In The Auto And IT Sector

शेअर बाजार:सेन्सेक्स 84 अंकांनी घसरून 56975 वर बंद; निफ्टी 33 अंक घसरला, ऑटो आणि आयटी क्षेत्रात सर्वाधिक घसरण

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेन्सेक्स आणि निफ्टी आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्या दिवशी घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 84.88 अंकांनी किंवा 0.15% घसरून 56,975.99 वर बंद झाला तर निफ्टी -33.45 (-0.2%) अंकांनी घसरून 17,069.10 वर बंद झाला. इंडसइंड बँक, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, एचडीएफसी, अल्ट्रा टेक सिमेंट आणि आयटीसी सेन्सेक्समध्ये सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली.

सेन्सेक्स 631.42 अंकांनी किंवा 1.11% घसरून 56,429.45 वर उघडला तर निफ्टी 176.30 (1%) अंकांनी घसरून 16,925.25 वर उघडला. आज सर्वात मोठी घसरण ऑटो आणि आयटी क्षेत्रातील समभागांत झाली.

सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या 11 शेअरमध्ये तेजी तर 19 शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली.
सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या 11 शेअरमध्ये तेजी तर 19 शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली.

मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये घसरण

मुंबई शेअर बाजारातील मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 100 हून अधिक अंकांनी घसरण झाली. मिड कॅपमध्ये अजंता फार्मा, झील, सुप्रीम इंडस्ट्रीज, सुप्रीम इंडिया, इन्ड्युरन्स, वरुण बेव्हरेज, बजाज होल्डिंग आणि टाटा पॉवर वाढले. तर क्लीन, आयडिया, एबी कॅपिटल, अपोलो हॉस्पिटल्स, ऑइल, माइंड ट्री, अशोक ले लँड आणि जेएसडब्ल्यू एनर्जीमध्ये घसरण झाली. स्मॉल कॅपमध्ये टाटा केमिकल्स, गोकलदास एक्स्प्रेस, वाडीलाल इंडस्ट्रीज, यारी, चेन्नई पेट्रो आणि कॅन फिन होम्सचे शेअर्स सर्वाधिक वाढले.

ऑटो आणि आयटी क्षेत्रात घसरण

11 निफ्टी निर्देशांकांपैकी 4 घसरले आणि 7 मध्ये तेजी दिसून आली. बँका, वित्तीय सेवा, एफएमसीजी, मीडिया, धातू, खासगी बँका आणि रियल्टी यांचा वाढलेल्या 7 क्षेत्रांमध्ये समावेश आहे. दुसरीकडे, फार्मा आणि पीएसयू बँकेत किंचित घट झाली. ऑटो आणि आयटीमध्ये सर्वाधिक घसरण झाली.

बातम्या आणखी आहेत...