आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:सेन्सेक्स 427 अंकाच्या तेजीसह 55,320 पातळीवर बंद, तर निफ्टी 16,478 पातळीवर पोहोचला

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर वाढीचा निर्णय घेतल्यामुळे भारतीय शेअर बाजारात नकारात्मक धारणा निर्माण झाली होती. त्यामुळे सकाळी बाजार घसरणीसह उघडला होता. मात्र, दिवसभराच्या व्यवहारादरम्यान बाजाराची धारणा सकारात्मक झाली. त्यामुळे भातरीय शेअर बाजारात सकारात्मक वाढ नोंदवण्यात आली.

मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स +427.79 अंक म्हणजेच +0.78% वाढीसह 55,320.28 या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी 121.85 अंक म्हणजेच 0.74% वाढीसह 16,478.10 या पातळीवर बंद झाला.

घसरणीसह उघडला होता बाजार

आठवड्यातील व्यवहाराच्या चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडला होता. सेन्सेक्स 378.32 अंकांनी किंवा 0.69% घसरून 54,514.17 वर आणि निफ्टी 93 अंकांनी घसरून 16,263 वर उघडला होता. मात्र, दोन्ही निर्देशांक तेजीसह बंद झाले.

बातम्या आणखी आहेत...