आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुख वार्ता:बाजार बहरला... आता लक्ष्य 60,000; बँकिंग सेक्टरमधील तेजीमुळे सेन्सेक्स 59,000 च्या पार

नवी दिल्ली/मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारी ऑटो-टेलिकॉम व गुरुवारी बँकिंग क्षेत्रासाठी सरकारी दिलाशाच्या घोषणांनी बाजारात नवे चैतन्य आले आहे. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स ५९,००० च्या पार पोहोचला. दिवसभरातील व्यवहारात तो ५९,२०४.२९ च्या विक्रमी उंचीवर पोहोचला. तो ४१७.९६ अंकांनी वधारून ५९,१४१.१६ वर बंद झाला. निफ्टीही ११०.०५ अंकांनी उसळून विक्रमी १७,६२९.५० वर बंद झाला. यात सर्वाधिक योगदान बँकिंग क्षेत्राने दिले. बीएसईच्या बँकेक्समध्ये सर्वाधिक २.१२% ची वाढ झाली. सरकारने गुरुवारी बँकांच्या मोठ्या एनपीएचा निपटारा करण्यासाठी बॅड बँक म्हणजे नॅशनल अॅसेट रिस्ट्रक्चरिंग कंपनी लि. तर्फे ८५% व्यवहाराची हमी देण्याची घोषणा केली. या घोषणेच्या अपेक्षेने बँकिंग क्षेत्रात तेजी राहिली, असे एलकेपी सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख रंगनाथन यांनी सांगितले.

भारतीय बाजार आता जगात सहाव्या स्थानी
गुरुवारी मार्केट कॅपिटलायझेशनबाबत आपण फ्रान्सला मागे टाकले. आता भारतीय शेअर बाजार जगातील सहावा मोठा बाजार आहे.

ईव्हीची क्रेझ... ओलाने लाँचिंगच्या पहिल्याच दिवशी विकल्या ६०० कोटींच्या इलेक्ट्रिक स्कूटर
मुंबई | ओला इलेक्ट्रिकच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर ओला एस-१ आणि एस-१ प्रोने लाँचिंगच्या पहिल्याच दिवशी विक्रीचा नवा विक्रम रचला. कंपनीचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी दावा केला की, पहिल्याच दिवशी ६०० कोटी रुपयांच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर विकल्या. त्यांचा दावा आहे की, ही रक्कम संपूर्ण टू-व्हीलर इंडस्ट्रीकडून एका दिवसात विकल्या जाणाऱ्या वाहनांच्या मूल्यापेक्षा जास्त आहे. सोशल मीडियावर ई-स्कूटरच्या यशाची माहिती देत अग्रवाल म्हणाले, कंपनीने गेल्या २४ तासांत प्रत्येक सेकंदाला ४ स्कूटरची विक्री केली.

बातम्या आणखी आहेत...