आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Share Market : Sensex Opens Up 310 Points And Nifty 58, Sensex Latest News And Updates

शेअर मार्केट : सेन्सेक्स 537 अंकांनी आणि निफ्टी 133 अंकांनी वधारत उघडले, बुधवारी डाउ जोन्स 2.39% आणि एसएंडपी 1.15% वर राहिले

Mumbai6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी सेन्सेक्स 6.98% आणि निफ्टी 6.62%च्या वाढीसह बंद झाले होते

मुंबई - भारतीय बाजार आज (गुरुवार) पुन्हा एकदा वाढीसह सुरु झाला. बुधवारच्या तुलनेत सेन्सेक्स 537 अंक आणि निफ्टी 133 पॉइंट्सच्या वाढीसह उघडले. सध्या सेन्सेक्स 1196.79 अंकांनी वाढून 29,732.57 वर आणि निफ्टी 210.55 पॉइंटनी वाढून 8,528.40 वर व्यापार करत आहेत. याआधी बुधवारी बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली होती. सेन्सेक्सने 1861.75 अंकांच्या वाढीसह 28,535.78 वर आणि निफ्टी 516.80 अंकांच्या वाढीसह 8,317.85 वर बंद झाला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसीच्या शेअर्सची जोरदार खरेदी झाल्यामुळे बाजारात तेजी नोंदविण्यात आली.

बुधवारी जगभरातील बाजारात झाली वाढ
बुधवारी अमेरिकी बाजारासह जगभरातील बाजारात तेजी पाहण्यास मिळाली. डाउ जोन्स 2.39 टक्क्यांच्या वाढीसह 459.64 अंकांनी वर 21,200.60 वर बंद झाला. मात्र अमेरिकेचा दुसरा बाजार नॅस्डॅक 0.45 टक्क्यांच्या घसरणीसह 33.56 अंक खाली 7,384.30 वर बंद झाला. दुसरीकडे एसअँडपी 1.15 टक्क्यांच्या वाढीसह 28.23 पॉइंटनी वधारत 2,475.56 अंकांवर बंद झाला. फ्रान्सचा CAC 40 वाढीसह 4,432.30 अंकांवर बंद झाला. 

0