आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Share Market Sensex Plunged 1163 Points To Below 57,000, Sinking 5 Lakh Crore Of Investors | Marathi News

शेअर बाजारात मोठी घसरण:सेन्सेक्स 1163 अंकांनी घसरून 57 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटी बुडाले; बँकिंग शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमकुवत जागतिक बाजाराच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय बाजाराची सुरुवात घसरणीने झाली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स 1,163 अंकांनी घसरून 56,989 अंकांवर पोहोचला. त्यामुळे पहिल्याच मिनिटात गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

आज शुक्रवारच्या तुलनेत 1,432 अंकांनी घसरून सेन्सेक्स 56,720 वर उघडला. पहिल्या तासातच तो 57,140 च्या वरच्या आणि 56,720 च्या खालच्या पातळीवर गेला. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी फक्त टीसीएसचे शेअर्स वाढले आहेत, उर्वरित 29 शेअर्स खाली आहेत. बँकिंग शेअर्स मोठ्या प्रमाणात तुटले आहेत. SBI 4%, HDFC 3% आणि ICICI बँकेचे शेअर 3.50% घसरले आहेत.

मार्केट कॅपची 258 लाख कोटींवर घसरण
शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज 258.11 लाख कोटी रुपये आले, जे शुक्रवारी 263.47 लाख कोटी रुपये होते. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 773 अंकांनी घसरून 58,152 वर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 231 अंकांनी घसरून 17,374 वर बंद झाला होता.

या शेअर्समध्येही मोठी घसरण
घसरलेल्या शेअर्समध्ये अल्ट्राटेक, डॉ. रेड्डी, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह आणि एचडीएफसी बँक 3% पेक्षा जास्त घसरले. एअरटेल, टायटन, एशियन पेंट्स, मारुती, टेक महिंद्रा, कोटक बँक, अॅक्सिस बँक, विप्रो नेस्ले यांचे शेअर्स 2% च्या तोट्यासह व्यवहार करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...