आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभांडवल बाजारात नव्या वर्षाची सुरुवात जाेरदार तेजीने झाली. बाजारात झालेल्या जाेरदार खरेदीच्या बळावर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ९०० अंकांची उसळी घेत पुन्हा ५९,००० अंकांची पातळी गाठली.
सत्राची आत्मविश्वासाने सुरुवात करत निर्देशांकाने दिवसभरात ५९,२६६.३९ अंकांची उच्चांकी पातळी गाठली. दिवसअखेर निर्देशांकात ९२९.४० अंकांनी वाढ हाेऊन ताे ५९,१८३.२२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील २७१.६५ अंकांनी वाढून १७,६२५.७० अंकांच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स यादीतील बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, टाटा स्टील, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक यांच्या समभागांच्या किमतीत जवळपास ३.५० टक्क्यांनी वाढ झाली. डाॅ. रेड्डीज लॅब, महिंद्र अँड महिंद्र, टेक महिंद्र आणि नेसले या समभागांना मात्र विक्रीचा फटका बसला. शेअर बाजाराने २०२१ वर्षाचा शेवट शुक्रवारी उच्च पातळीवर केला. सरत्या वर्षातील व्यवहाराच्या अखेरच्या दिवशी सेन्सेक्स ४५९.५० अंकांनी किंवा ०.८० टक्क्यांनी वाढून ५८,२५३.८२ अंकांच्या पातळीवर बंद झाला आणि निफ्टी १५०.१० अंकांनी किंवा ०.८७ टक्क्यांनी वाढून १७,३५४.०५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. वार्षिक आधारावर २०२१ मध्ये सेन्सेक्समध्ये २१.९९ टक्के किंवा १०,५०२.४९ अंकांची वाढ झाली, तर निफ्टीमध्ये २४.११ टक्के किंवा ३,३७२.३ अंकांनी वाढ झाली. सोमवारी २०२२ च्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी आशियाई शेअर बाजारात संमिश्र वातावरण हाेते. हाँगकाँग शेअर बाजारात घसरण झाली, तर दक्षिण कोरिया शेअर बाजाराने चढता क्रम कायम ठेवला.
वर्षाची सुरुवात भारतीय बाजारपेठेत चांगली झाली असली तरी स्विस ब्रोकरेज फर्म यूबीएसच्या मते देशांतर्गत शेअर बाजारात आणखी एक सुधारणा बाकी आहे. २०२२ च्या सुरुवातीला निफ्टी थांबेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.