आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Share Market Update Today | Union Budget 2023 | Gautam Adani | Nirmala Sitharaman | Stock Market

बजेटनंतर शेअरबाजार:सेन्सेक्स 158 अंकांनी वाढून 59,708 वर बंद, निफ्टीत 45 अंकांची घट, अदानी एंटरप्राइजेसची 26% घसरण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2023-24चा अर्थसंकल्प सादर केला. यामुळे साहजिकच शेअर बाजाराचेही लक्ष सरकारच्या घोषणांकडे होते. आज भारतीय बाजार तेजीत उघडले. अर्थसंकल्पीय भाषणानंतर सेन्सेक्समध्ये सुमारे 1000 अंकांची वाढ दिसून आली. तथापि, नंतर तो केवळ 158 अंकांच्या वाढीसह 59,708 वर बंद झाला. तर निफ्टी 45 ​​अंकांनी घसरून 17,616 वर बंद झाला.

जर आपण अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजाराचा कल बघितला, तर गेल्या 7 वर्षांत सरासरी 0.9% ची सकारात्मक हालचाल झाली आहे. 2021 मध्ये बजेटच्या दिवशी बाजार 5% वाढला होता.

अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 26.70% घसरले

दुसरीकडे, अदानी समूहाचे समभाग - अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर, अदानी पोर्ट्स, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन, अदानी विल्मर, एसीसी आणि अंबुजा हिंडनबर्ग अहवालामुळे दबावाखाली राहिले. अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 26.70% घसरून रु. 2,179.75 वर बंद झाले.

ICICI बँक आणि JSW स्टील टॉप गेनर्स

आयसीआयसीआय बँक, जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, टाटा स्टील, ब्रिटानिया, सिप्ला आणि एचडीएफसी बँकेसह 23 निफ्टी-50 समभाग वाढले. त्याच वेळी, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी लाइफ आणि एसबीआय लाइफसह 27 निफ्टी समभागांमध्ये घसरण झाली.

PSU बँक क्षेत्रात सर्वाधिक 5.68% घसरण

NSE वरील 11 पैकी नऊ क्षेत्रीय निर्देशांक घसरले. PSU बँक क्षेत्रात सर्वाधिक 5.68% घसरण झाली. धातूमध्ये 4.50% आणि मीडिया क्षेत्रात 2.70% ची घसरण झाली. याशिवाय बँका, वाहन, वित्तीय सेवा, फार्मा, खासगी बँका आणि रिअल्टी क्षेत्रांतही घसरण झाली. केवळ एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रात तेजी दिसून आली.

49 अंकांच्या वाढीसह बंद झाला होता सेन्सेक्स

मंगळवारी (31 जानेवारी) शेअर बाजारात तेजी होती. सेन्सेक्स 49 अंकांच्या वाढीसह 59,549च्या पातळीवर बंद झाला होता. त्याच वेळी निफ्टी 13 अंकांनी वाढून 17,662च्या पातळीवर पोहोचला. सलग दुसऱ्या दिवशी बाजारातील ही वाढ होती. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 15 समभागांमध्ये वाढ झाली होती. तर केवळ 15 समभाग घसरले होते.

तज्ज्ञांचे मत काय?

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, निफ्टी सपोर्ट झोनमधून उलटला आहे आणि 17,550 वर 200 EMA वर बंद करण्यात यशस्वी झाला आहे. 17,900 पातळीपर्यंत रिलीफ रॅली अपेक्षित आहे, तेथून पुन्हा 18050 - 18100 पर्यंत विक्रीचा दबाव दिसून येईल. डाउनसाइडवर, तत्काळ सपोर्ट 17,550 जवळ आणि 17,400 च्या खाली पाहिला जाऊ शकतो.

अमेरिकन बाजारात तेजी, रुपया घसरला

यूएस स्टॉक निर्देशांक मंगळवारी 1% पेक्षा जास्त तेजीत बंद झाले. डाऊ जोन्स 1.09%, S&P 500 1.46% आणि नॅसडॅक 1.67% वर होते. जपान, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँगच्या बाजारातही आज तेजी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे रुपयाबद्दल बोलायचे झाले, तर मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 41 पैशांच्या घसरणीसह 81.93 वर बंद झाला.

बातम्या आणखी आहेत...