आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय शेअर बाजारात आज गुरुवारी (16 मार्च) सलग 6 व्या दिवशी घसरण दिसून आली. सेन्सेक्स 45 अंक कोसळून 57,511 वर उघडला. याऊलट निफ्टी 22 अंकांच्या वाढीसह 16,994 वर उघडला. सकाळी साडे 9 वा. सेन्सेक्सच्या 30 पैकी 19 शेअर्समध्ये घसरण, तर अवघ्या 11 शेअर्समध्ये वाढ दिसून आली.
सकाळी साडे 9 वा. सेन्सेक्सच्या 30 पैकी 19 शेअर्समध्ये घसरण व 11 शेअर्सममध्ये वाढ दिसून आली.
अदानी एंटरप्रायझेसचा शेअर 0.80% कोसळला
अदानी समूहाच्या 10 पैकी 6 शेअर्समध्ये घसरण, तर 4 शेअर्समध्ये वाढ दिसून आली. समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स सकाळी 9.30 वाजता 0.80 टक्क्यांनी घसरले. अदानी विल्मरही 1.22% खाली होता. तथापि, अदानी ट्रान्समिशन, पोर्ट्स, पॉवर व ग्रीन एनर्जीचे समभाग वाढीसह व्यवहार करत होते.
जागतिक बाजाराचे संमिश्र संकेत
क्रेडिट सूइस संकट टळण्याच्या आशेने जागतिक बाजारातील आशा पल्लवित झाल्या आहेत. DOW FUTURES निम्न पातळीपासून 200 अंकांच्या वर व्यापार करत आहे. तर SGX NIFTY व आशियाई बाजारांतही चांगली रिकव्हरी दिसून येत आहे. काल शेवटच्या तासात यूएस मार्केटने खालच्या पातळीवरून चांगली रिकव्हरी दाखवली. डाऊ जोन्स 281 अंकांनी घसरून बंद झाला. काल S&P 500 ही 0.70% कोसळून बंद झाला. नॅस्डॅक अवघ्या 6 अंकांच्या वाढीसह बंद झाला.
FIIs करत आहेत विक्री
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) बुधवारी सलग 5व्या दिवशी भारतीय बाजारात विक्री केली. FII ने बुधवारी रोख बाजारात 1,271 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली. दुसरीकडे, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) काल 1,824 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. FII ने या महिन्यात आतापर्यंत एकूण 8,457 कोटी रुपयांची खरेदी केली. तर DII ने एकूण 12,294 कोटी रुपयांची विक्री केली.
बुधवारी सेन्सेक्समध्ये 344 अंकांची घसरण
तत्पूर्वी, बुधवारीही (15 मार्च) बाजारात घसरण झाली होती. सेन्सेक्स 344 अंकांनी घसरून 57,556 वर बंद झाला. निफ्टीही 123 अंकांनी घसरून 16,972 वर बंद झाला. सेन्सेक्सच्या 30 पैकी 21 शेअर्स घसरले. केवळ 9 शेअर्समध्ये वाढ दिसून आली. बाजारातील विक्रीत बँकिंग स्टॉक्स आघाडीवर होते.
क्रूड 15 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
बँकिंग संकटाच्या चिंतेने क्रूड अर्थात कच्चे तेल 5% पेक्षा जास्त कोसळले आहे. क्रूडमध्ये 3 दिवसांत 10% हून अधिक घसरण झाली. यामुळे ते 15 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. त्याची किंमत सुमारे 74 डॉलर्सच्या आसपास आहे. काल ब्रेंटचा दर 72 डॉलर्सच्या खाली घसरला होता. यामुळे त्याची किंमत 4% हून अधिक तुटली होती. ब्रेंटचे दर मागील 3 दिवसांत 10.50% पेक्षा जास्त घसरले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.