आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न-उत्तर:नायकासारखे शेअर आता धोकादायक

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसबीआय कार्ड््स, एलआयसी, झोमॅटोचे शेअर तोट्यात आहेत, काय करू? -अनिल ढिंगरा एसबीआय कार्ड दीर्घकाळासाठी होल्ड करा. झोमॅटोमध्ये जास्त जोखीम आहे. एलआयसीमध्ये चंागली शक्यता आहे. मात्र यासाठी धैर्य ठेवावे लागेल. रेलटेल होल्ड करू शकता.

नालको, नायका आणि टेक्स्मो पाइपचे शेअर होल्ड करू की विकू? -आबिद मुगल नालको होल्ड करू शकतात. टेक्समो पाइपमधून एस्ट्रल किंवा प्रिंस पाइप्समध्ये स्विच करू शकता. नायकातून बाहेर पडा. गैर-आवश्यक ग्राहक खर्चात कपात केल्यामुळे कंपनीला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.

निपन इंडियाचे शेअर दीर्घकाळासाठी होल्ड करणे ठीक राहील का ?- सुनीलकुमार चौरसिया निपन इंडिया होल्ड करू शकता. हाय-मार्जिन इक्विटी विभागात याचे मार्केट शेअर ६.२% वर स्थिर झाले आहे.

मारुती सुझुकीविषयी काय मत आहे? -आकांक्ष चांगली मागणी आणि पुरेसे प्रॉडक्ट रेंजसह मारुती-सुझुकीचे मार्केट शेअर आणि मार्जिन चांगले आहेत. नव्या लाँचिंग व्यतिरिक्त पेट्रोल/हायब्रिडमध्ये विस्तार आणि एसयुव्ही सेगमेंटमध्ये मार्केट लीडरशिप मिळवण्याच्या योजनेतून ११% वाढीची अपेक्षा आहे.

६०.६० रु. भावाने आरपीपी इन्फ्रा,९०.७५ रु. भावावर सिंटेक्सचे शेअरचे काय करू ? - संजय आरपीपी इन्फ्रातून एचजी इन्फ्रा किंवा पीएसपी प्रोजेक्ट्समध्ये स्विच करा. फंडामेंटल्स खूप चांगले आहेत.