आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागौतम अदानींच्या कंपन्यांसाठी सोमवारची सकाळ चांगली ठरली नाही. ग्रुपच्या 6 लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स 5% वरुन 22% पर्यंत घसरले आहेत. यामध्ये सर्वात जास्त अदानी एंटरप्रायजेसचे शेअर पडले आहेत. शेअर्स 22% घसरून 1,200 रुपये झाले आहेत. शुक्रवारी हे 1600 रुपयांवर बंद झाले होते. यानंतर इतर कंपन्यांचे शेअर्सही त्याच मार्गाने पडले. यामुळे सुरुवातीच्या एक तासात गुंतवणूकदारांचे सुमारे 50,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
3 परदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीवर शंका
शेअर्सच्या घसरणीचे कारण हे होते की, सेबीने या ग्रुप कंपन्यांमधील अशा तीन परदेशी गुंतवणूकदारांना पकडले, ज्यांना बोगस मानले जाते. हे तीन गुंतवणूकदार आहेत - अल्बुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड. हे सर्व मॉरीशसची राजधानी पोर्ट लुईसच्या एका पत्त्यावर रजिस्टर्ड आहेत. त्यांची वेबसाइटसुद्धा नाही. या तिघांची गुंतवणूक सेबीने फ्रिज केली असून तपास सुरू झाला आहे.
एकूण गुंतवणूक 43,500 कोटी रुपये
नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (NDSL) नुसार अदानीच्या कंपन्यांमध्ये या तिघांची एकूण गुंतवणूक 43,500 कोटी रुपये आहे. ही खाती फ्रिज केली गेली कारण सेबीकडे त्यांच्याविषयी माहिती नाही. तसेच, या पैशांचे मालक कोण आहेत, हे देखील माहिती नाही. त्यामुळे त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अदानी समूहाचा कोणताही मुद्दा नाही परंतु त्यांच्या शेअर्समध्ये ही गुंतवणूक आहे, त्यामुळे या ग्रुपच्या शेअर्समध्ये घट दिसून आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.