आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Shares Of Adani Group Companies Fell By 18 Pecent; Stakeholders Froze Accounts Of 3 Foreign Funds, Net Worth Reduced By Rs 60,000 Crore; News And Live Updates

एनएसडीएलची कारवाई:अदानी समूहासाठी ब्लॅक मंडे; हिस्सेदार 3 विदेशी फंड्सची खाती गोठवली, नेटवर्थ 60 हजार कोटींनी कमी

नवी दिल्ली/मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिन्ही फंड्सने केवायसीशी संबंध‍ित माहिती दिलीच नाही, यामुळे एनएसडीएलची कारवाई

आशियातील दुसरी सर्वात व्यक्ती श्रीमंत गौतम अदानींसाठी सोमवार काळा दिवस ठरला. सकाळी नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडने (एनएसडीएल) अदानी समूहातील कंपन्यांत हिस्सेदार ३ विदेशी फंड्सची खाती गोठवल्याची बातमी आली. यानंतर अदानी समूहाचे शेअर्स २५% पर्यंत गडगडले. ग्रुपच्या ६ पैकी ५ कंपन्यांच्या शेअर्समध्ये लोअर सर्किट लागले. अदानी समूहाकडून खंडन झाल्यानंतर शेअर्समध्ये सुधारणा झाली. या घसरणीमुळे अदानी समूहाची नेटवर्थ ९.५ लाख कोटी रुपयांवरून ८.९ लाख कोटींवर आली. म्हणजे त्यात ६० हजार काेटींची घट झाली. फोर्ब्जनुसार गौतम अदानींची वैयक्तिक संपत्ती ५.४७ लाख कोटींवरून ५.०७ लाख कोटी रुपयांवर घसरली.

अदानी ग्रुपच्या समभागांत अनपेक्षित वाढ, याचीही सेबीकडून चौकशी
गेल्या वर्षभरात अदानी समूहाच्या समभागांत (शेअर्स) २०० ते ९७२ टक्क्यांपर्यंतची तेजी आली होती. वर्षभरात अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये ६६९%, अदानी टोटल गॅसच्या शेअर्समध्ये ३४९%, अदानी एंटरप्रायझेसमध्ये ९७२% आणि अदानी ग्रीनच्या शेअर्समध्ये २५४% वाढ झाली आहे. अशीच वाढ अदानी पोर्ट‌्सच्या शेअरमध्ये १४७% आणि अदानी पाॅवरच्या शेअर्समध्ये २९५% वाढ नोंद झाली आहे. शेअर्सच्या वाढीमुळे समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. अदानी ग्रुपमधील कंपन्यांच्या शेअरमधील अनपेक्षित वाढीची सेबीमार्फत स्वतंत्र चौकशी केली जात आहे.

काय आहे नेमके प्रकरण? खाती गोठवण्यात आलेल्या कंपन्या अदानी समूहात सुमारे ४३.५ हजार कोटी रुपयांच्या भागीदार
एनएसडीएलने अल्बुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंडांची खाती गोठवली. त्यांच्याकडे अदानी समूहातील ४ कंपन्यांचे ४३,५०० कोटी रुपयांचे शेअर आहेत. एनएसडीएलच्या मते, नव्या नियमांनुसार विदेशी गुंतवणूकदारांना काही अतिरिक्त माहिती द्यायची होती जी दिली गेली नाही. त्यामुळे विदेशी फंड संशयाच्या भोवऱ्यात आहेत. आतापर्यंत या कंपन्यांविषयीची अधिकृत माहिती अदानी समूह किंवा एनएसडीएलने दिली नाही किंवा ती जाहीरही केली नाही.

आमची खाती गोठवली नाहीत : अदानी समूह
अदानी ग्रुपचे सचिव कमलेश भागिया म्हणाले, ‘आमच्या प्रमुख शेअरधारकांपैकी तीन विदेशी फंडांची डिमॅट खाती नव्हे तर जीडीआर खाती गोठवली गेलीत. आम्ही या फंडांच्या डिमॅट खात्यांची स्थिती रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंटांना कळवली आहे.’

‘हे तर स्कँडल’च आहे : पत्रकार सुचेता दलाल
अदानी ग्रुपच्या शेअर्समधील पडझड पत्रकार सुचेता दलाल यांच्या ट्वीटनंतर सुरू झाली. त्यांनी अदानींचे नाव न घेता या घटनाक्रमाला ‘स्कँडल’ संबोधले. सुचेता यांनीच १९९२ मध्ये हर्षद मेहताचा बहुचर्चित शेअर बाजार घोटाळा उघड केला होता.

म्हणून वाढला संशय: तिन्ही कंपन्यांनी केवळ अदानी ग्रुपमध्येच गुंतवणूक केली
तिन्ही कंपन्या पोर्ट लुईसमध्ये(माॅरिशस) रजिस्टर्ड आहेत. अल्बुला इन्व्हेस्टमेंट २३ जानेवारी २००७, क्रेस्टा फंड २१ ऑक्टोबर २००७, आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंड २९ नोव्हेंबर २००५ मध्ये रजिस्टर्ड झाले. तिन्ही कंपन्या अदानी समूहातील १२ मोठ्या गुंतवणूकदारांमध्ये मोडतात. त्यांनी आपली ९६ टक्के गुंतवणूक अदानी समूहातच केली आहे.

आता पुढे काय?: फंड्स ना ही भागीदारी विकू शकतील ना खरेदी करू शकतील
एनएसडीएलच्या कारवाईनंतर तिन्ही विदेशी फंड कंपन्या आपली भागीदारी विकू शकतील ना आपली भागीदारी वाढवू शकतील. सूत्रांनी सांगितले की, एनएसडीएलने पुन्हा एकदा या कंपन्यांना “केवायसी’शी संबंधित माहिती मागवली आहे. ही माहिती बरोबर असेल तर खात्यांवरील बंदी हटवली जाईल, अन्यथा मनी लाँड्रिंगचा गुन्हा लावला जाईल.

समूहाच्या शेअर्सना फटका
सोमवारी गौतम अदानी यांची संपत्ती 5.47 लाख कोटींनी घटून 5.07 लाख कोटी झाली : फोर्ब्ज

  • अदानी पोर्ट -8.49%
  • अदानी एंटरप्रायझेस -6.25%
  • अदानी पाॅवर -4.99%
  • अदानी ट्रान्समिशन -5.00%
  • अदानी टोटल गॅस -5.00 %
  • अदानी ग्रीन -0.39%