आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Shares Of Reliance Fell 8 Per Cent; Mukesh Ambani's Wealth Declines By Rs 52,000 Crore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:रिलायन्सचे शेअर्स 8.62 टक्क्यांनी घसरले; मुकेश अंबानींची संपत्ती 52 हजार कोटी रुपयांनी घटली

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिलायन्सच्या शेअर्समध्ये या वर्षी जवळपास 29% ची तेजी दिसली

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींचे नेटवर्थ एका झटक्यात ५२,००० कोटी रुपयांनी घटले. तिमाही नफ्यातील घसरणीनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गेल्या तीन महिन्यांत सर्वात मोठी घसरण आल्याने ही स्थिती ओढवली. सोमवारी कंपनीचे शेअर्स ८.६२% ने गडगडले. ते १७७ रुपयांनी घसरून १८७७ रुपयांवर बंद झाला. यामुळे अंबानींची एकूण संपत्ती सुमारे ५.२५ लाख कोटी रुपये (७१०० कोटी डॉलर) राहिली आहे. ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सनुसार, हा मार्चनंतर त्यांचा सर्वात वाईट दिवस राहिला. शुक्रवारी रिलायन्सने तिमाही निकाल जाहीर केले. यात १५% घटीसह ९,५७० कोटींचा नफा दाखवला. कोरोनामुळे इंधनाची मागणी घटल्याने महसूल २४% घटून १.१६ लाख कोटी रु. राहिला. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स समूह ऑइल व पेट्रोकेमिकल क्षेत्रातील दिग्गज कंपनी झाल्यानंतर स्वत:ला तंत्रज्ञान आणि डिजिटल सेवांकडे वळवत आहे. ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्सनुसार, रिलायन्सच्या शेअर्समध्ये या वर्षी जवळपास २९% ची तेजी दिसली.