आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • Shares Of Tesla Are The First Choice Of Indian Investors, Followed By Apple; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:टेस्लाचे शेअर भारतीय गुंतवणूकदारांची पहिली पसंत, अॅपल दुसऱ्या क्रमांकावर; दोन वर्षांपासून भारतीय गुंतवणूकदारांत जागतिक गुंतवणुकीचा कल वाढला

मुंबई2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • भारतीय गुंतवणूकदारांचे अलीकडे इंटरनॅशनल एक्स्पोजर वाढले

इलेक्ट्रिक कार निर्माती कंपनी भले सध्या भारतीय बाजारात आली नाही, मात्र भारतीय गुंतवणूकदारांवर टेस्लाने गारूड केले आहे. भारतीय गुंतवणूकदारांनी गेल्या सहा महिन्यांत अमेरिकी बाजारात जेवढी गुंतवणूक केली, त्याचा पाचवा हिस्सा एकट्या एलन मस्क यांच्या कंपनीत गेला आहे. अॅपल याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर मायक्रोसॉफ्ट अाणि अॅमेझॉन संयुक्तरीत्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत. गेल्या काही वर्षांपासून शेअर्समध्ये पैसा गुंतवणाऱ्या भारतीय गुंतवणूकदारांची आंतररारष्ट्रीय स्तरावरही गुंतवणूक वाढली आहे.

विशेषत: अमेरिकी बाजारात जास्त रस घेत आहेत. भारतीय केवळ अमेरिकी शेअर्समध्येच गुंतवणूक करत नाहीत तर, ते ईटीएफमध्येही चांगला पैसा गुंतवत आहेत. यासोबत काही असामान्य कलही समाेर आले आहेत. उदा. गेमस्टॉप आणि एएमसी एंटरटेनमेंट होल्डिंग्जसारख्या मीम शेअर्सवर भारतीय गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म वेस्टेड फायनान्सच्या आकडेवारीनुसार, २०२१ च्या पहिल्या सहामाहीत सर्वात जास्त १९ टक्के भारतीय गुंतवणूकदारांनी टेस्लात पैसा गुंतवला आहे.

क्रिप्टो एक्स्चेंज अॅसेट क्लासही लोकप्रिय
भारतीय गुंतवणूकदार क्रिप्टो करन्सीसारख्या नव्या अॅसेट क्लासमध्ये गुंतवत आहेत. कॉइनबेस याचे मोठे उदाहरण आहे. हा शेअर बाजारात लिस्ट होणारा जगातील पहिला क्रिप्टो बाजार आहे. याचा आयपीओ एप्रिलमध्ये आला तेव्हापासून भारतीय गुंतवणूकदारांचा १० वा आवडीचा शेअर आहे. भारतात क्रिप्टो करन्सीला मान्यता मिळालेली नसतानाची ही स्थिती आहे.

अमेरिकी ईटीएफमध्येही भारतीयांची रुची
भारतीय गुंतवणूकदार केवळ अमेरिकी कंपन्यांच्या शेअर्समध्ये नव्हे तर तेथील ईटीएफमध्येही गुंतवणूक करत आहेत. एआरके ईटीएफ त्यांची पहिली पसंत आहे. याशिवाय इनोव्हेशन फोकस्ड ईटीएफ एआरकेके आणि जिनोमिक्स फोकस्ड ईटीएफ एआरकेजी भारतीय गुंतवणूकदारांच्या पसंतीच्या टॉप १० ईटीएफमध्ये समाविष्ट आहेत.

पहिल्या सहामाहीत भारतीयांचे टॉप १० आवडीचे अमेरिकी शेअर
भारतीय गुंतवणूकदारांत जागतिक गुंतवणुकीचा कल गेल्या दोन वर्षांत वाढला आहे. प्रसिद्ध ब्रँडबाबत जागरूकता वाढण्यात तंत्रज्ञान कंपन्यांचे आयपीओ येणे हे याचे सर्वात मोठे कारण राहिले. - विरम शहा, सीईओ, वेस्टेड फायनान्स

 • शेअर हिस्सेदारी
 • टेस्ला 19%
 • अॅपल 15%
 • मायक्रोसॉफ्ट 11%
 • अॅमेझॉन 11%
 • शॉपीफाय 9%
 • एएमसी 8%
 • एनव्हिडिया 7%
 • फेसबुक 7%
 • सेल्सफोर्स 6%
 • नेटफ्लिक्स 6%
 • ईटीएफ गुंतवणूक
 • एआरकेके 17%
 • वू 14%
 • एआरकेजी 10%
 • व्हीजीटी 9%
 • क्यूक्यूक्यू 9%
 • व्हीवायएम 9%
 • आयएयू 9%
 • टीएलटी 8%
 • एसओएक्सएल 8%
 • आयजेआर 7%
बातम्या आणखी आहेत...