आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याजदराच्या वाढीचा परिणाम:रिझर्व्ह बँकेचा धक्का;  विक्रीच्या माऱ्यात निर्देशांकाची 1,307 अंकांनी घसरण

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिझर्व्ह बँकेने अचानक केलेल्या महत्त्वाच्या व्याजदराच्या वाढीचा परिणाम बुधवारी शेअर बाजारात स्पष्टपणे दिसून आला. बँक, रिअल इस्टेट आणि वाहन समभागांच्या नेतृत्वाखालील सर्वांगीण विक्रीमुळे सेन्सेक्स १,३०६.९६ अंकांनी घसरून ५५,६६९.०३ वर बंद झाला. निफ्टी ३९१.५० अंकांनी घसरून १६,६७७.६०वर बंद झाला. दुपारनंतर विक्रीचा जोर असा होता की सेन्सेक्स १४७४.३९ अंकांनी घसरून ५५,५०१.६० वर आणि निफ्टी ४४५.१५ अंकांनी घसरून १६,६२३.९५ वर आला. रिअल्टी इंडेक्स ३.३१%, बँकेक्स २.२९% आणि ऑटाे इंडेक्समध्ये २.५३ टक्क्यांची घसरण झाली. सेन्सेक्स यादीतील ३० पैकी २७ कंपन्यांच्या समभागांची घसरण झाली. घसरला.

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले, “बाजाराला व्याजदरात वाढ अपेक्षित होती, परंतु रेपो आणि सीआरआरमध्ये अचानक वाढ केल्याने बाजाराला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी जगातील शेअर बाजारही सावध राहिले. फेडने व्याजदरात ५० बेस पॉइंट्सपेक्षा जास्त वाढ केल्यास, देशांतर्गत बाजारातील घसरणीचा कल आणखी वाढू शकतो.

बातम्या आणखी आहेत...