आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Shopping Method, Online Method Use 2 Percentage,  Grocery Shopping 86% First Choice Near Shopi, Latest News And Update 

खरेदीची शैली अजूनही जैसे थे च:घराशेजारी असलेल्या दुकानात किराणा खरेदीसाठी 86% नागरिकांची पसंती, ऑनलाईनला 2% पसंदी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन शॉपिंगच्या या युगात किराणा सामान खरेदी करताना, 86% लोक त्यांच्या शेजारच्या दुकानदाराला प्राधान्य देतात. केवळ 2% लोक किराणा सामान खरेदी करण्यासाठी ऑनलाईन पद्धत वापरतात. अ‌ॅक्सिस माय इंडिया या संशोधन संस्थेच्या ग्राहक भावना सर्वेक्षणात हे सत्य समोर आले आहे.

त्यानुसार ऑनलाइन किराणा खरेदी करणारे 17% ग्राहक Amazon चा वापर करतात. तर 15% Flipkart वापरतात. 8 % लोक जिओ मार्ट वरून खरेदी करतात. या सर्वेक्षणात 10,207 लोकांची मते जाणून घेण्यात आली. यापैकी 70% लोक ग्रामीण भागातील होते. तर उर्वरित 30% लोक शहरी भागातील होते.

37% लोकांनी सणासुदीला कपडे खरेदी केले
ऑक्टोबरमधील सणांच्या काळात, 11% कुटुंबांनी टीव्ही, फ्रीज इत्यादी अनावश्यक वस्तूंवर खर्च केला. या दरम्यान, 29% ग्राहकांनी जास्त खरेदी केली. 37% कपड्यांवर, 23% किराणा मालावर आणि 14% खाद्यपदार्थांवर जास्त खर्च करतात. 6% लोकांनी इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी केली. 17% लोकांनी सणांच्या काळात दागिन्यांची खरेदी केली. यापैकी 13% खरेदीदारांनी त्यांच्या कौटुंबिक ज्वेलर्स किंवा स्थानिक ज्वेलर्सकडून दागिने खरेदी केले, तर 4% ने ब्रँडेड किंवा हॉलमार्क असलेल्या दागिन्यांच्या दुकानातून खरेदी केली.

घरगुती खर्चात 59% वाढ
सर्वेक्षणानुसार, गेल्या महिन्यात सर्वेक्षण केलेल्या 59% लोकांच्या घरगुती खर्चात वाढ झाली आहे. 8% लोकांनी खर्चात घट नोंदवली आणि 33% लोकांनी मागील वर्षी प्रमाणेच खर्च केल्याचा अहवाल दिला. ४६% कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तूंवरील खर्च वाढला आहे. 39% कुटुंबांसाठी आरोग्याशी संबंधित खर्च वाढला आहे.

भारत ग्राहक भावना निर्देशांक

बातम्या आणखी आहेत...