आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Shortage Of Diesel, Inflation May Rise, America Will Be Hit The Hardest, India Will Also Feel It

जगात डिझेलचा वाढता तुटवडा:डिझेलचा तुटवडा, वाढू शकते महागाई, अमेरिकेला सर्वाधिक फटका, भारतालाही जाणवणार

न्यूयॉर्क9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कच्च्या तेलासह अनेक आवश्यक वस्तूंच्या किमती कमी झाल्याने थोडाफार दिलासा मिळाला होता, मात्र तोही आता गायब झाला आहे. सामान्य जीवन आणि पूर्ण जगभराच्या अर्थव्यवस्थेसाठी सर्वात महत्त्वाचे असलेले इंधन डिझेलची कमतरता पडणार आहे. पुढच्या काही महिन्यांत जगाच्या प्रत्येक भागावर याचा परिणाम होणार आहे. डिझेलच्या तुटवड्याची चिन्हे आतापासून जाणवू लागली आहेत. अमेरिकेत डिझेलचा स्टॉक सुमारे ४० वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. युरोपातही जवळजवळ हीच परिस्थिती आहे. मार्चपर्यंत ही परिस्थिती आणखी बिघडणार आहे. जेव्हा समुद्री मार्गातून रशियातील डिझेल आयातीवर बंदी लागेल. परिस्थिती आधीच बिघडू लागली आहे. डिझेलच्या जागतिक निर्यातीत घट होऊ लागली असून, त्याचा सर्वाधिक परिणाम पाकिस्तानसारख्या गरीब देशांवर होणार आहे. खरे तर डिझेलवर बस, ट्रक, जहाज अाणि रेल्वे चालतात, तर कन्स्ट्रक्शन व शेतीत कामी येणारे यंत्र आणि फॅक्टऱ्यादेखील चालतात.

अमेरिकेला ८.१७ लाख कोटींचा झटका राइस विद्यापीठाचे बेकर इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक पॉलिसी एनर्जी फेलो मार्क फिनलीच्या मते, डिझेलचे भाव वाढल्याने एकट्या अमेरिकेला सुमारे १०० अब्ज डॉलर (८.१७ लाख कोटी रुपये)चा फटका बसेल. फिनली म्हणाले, आपल्या देशात डिझेलच्या जोरावर प्रत्येक गोष्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचते. अशा परिस्थितीत त्याची कमतरता गंभीर परिणाम दर्शवेल.

सर्वात मोठे डिझेल संकट इटलीची ऑइल रिफायनिंग कंपनी सारस एसपीएचे माजी सीईओ डारियो स्कॅफार्डी यांनी सांगितले, ‘आम्ही यापेक्षा मोठे डिझेल संकट पाहिले नाही.’ डारिओने ऑइल रिफायनिंग इंडस्ट्रीत सुमारे ४० वर्षे काढली. मागणी, पुरवठा लक्षात घेता डिझेल आणखी वाढू शकते.

अमेरिकेत ५०% महाग अमेरिकेत डिझेल महाग होत आहे. डिझेलचे बेंचमार्क न्यूयॉर्क हार्बरचे भाव ५०% वाढले आहेत. नोव्हेंबरची सुरुवात ही ४.९० डॉलर प्रति गॅलन (१०५.७३ रुपये प्रतिलिटर) राहिले, ते एका वर्षाच्या तुलनेत दुप्पट भाव आहे. नवी दिल्लीत मंगळवारी डिझेल ८९.६२ रुपये प्रतिलिटर राहिले.

दिलासा मिळणार नाही रशिया हा मोठा डिझेल पुरवठादार आहे. तेथून पुरवठा कमी झाल्याने त्याचा तुटवडा निर्माण झाला. सध्या, जागतिक स्तरावर डिझेलची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेशी उत्पादन क्षमता नाही. सध्या तीन नवीन मोठ्या रिफायनरी बांधल्या जात आहेत. चीन आणि सौदी अरेबियाचा समावेश आहे.

भारतावर थेट परिणाम ऊर्जा तज्ञ नरेंद्र तनेजा यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेतील किमतींवर होऊ शकतो. ते म्हणाले की, देशातील रिफायनिंग क्षमता चांगली आहे, त्यामुळे पुरवठ्याची अडचण येणार नाही. पण देशात डिझेलच्या किमती ज्या तराजूवर ठरतात, त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत अव्वल आहे.

बातम्या आणखी आहेत...