आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिलिकॉन व्हॅली बँक (SVB) नंतर आता सिग्नेचर बँकही तात्पुरती बंद करण्यात आली आहे. सिग्नेचर बँकेकडे क्रिप्टोकरन्सीचा साठा होता. त्याचा धोका लक्षात घेऊन काही काळ बँक बंद ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी या बँकेच्या शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळाली होती.
सिग्नेचर बँक ही न्यूयॉर्कमधील प्रादेशिक बँक आहे. न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या म्हणण्यानुसार, फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (FDIC) ने सिग्नेचर बॅंक घेतली होती. ज्याची मालमत्ता गेल्या वर्षाच्या अखेरीस 110.36 अब्ज डॉलर होती. यूएस ट्रेझरी डिपार्टमेंट आणि इतर बँक नियामकांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, "सिग्नेचर बँक आणि सिलिकॉन व्हॅली बँकेच्या कोणत्याही तोट्याचा भार करदात्यांना सहन करावा लागणार नाही.
SVB संकटाचा सामना; आज तातडीची बैठक
फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि फेडरल रिझर्व्ह एक फंड तयार करण्याचा विचार करत आहेत जेणेकरून इतर बँकांना SVL संकटाचा फटका बसू नये. यूएस फेडरल रिझर्व्हनेही सोमवारी म्हणजेच 13 मार्च रोजी तातडीची बैठक बोलावली आहे. यामध्ये, यूएस फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऑफ गव्हर्नर्स या संकटाचा सामना करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करेल.
भारताची SVC बँकही अडचणीत
अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) बंद केल्यामुळे मुंबईतील 116 वर्ष जुन्या बँकेच्या काही ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मोठ्या संख्येने ग्राहक त्यांच्या ठेवींची स्थिती जाणून घेण्यासाठी बँकेत पोहोचले. ग्राहकांच्या भीती दूर करण्यासाठी बँकेला स्टेटमेंटही जारी करावे लागले.
मुंबईत शामराव विठ्ठल सहकारी बँक म्हणजेच SVC ही बँक आहे. अमेरिकेची SVB आणि SVC बँक ऑफ मुंबई यांची समान नावे आहेत. त्यामुळेच ग्राहकांचा गैरसमज झाला. यानंतर बँकेने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, त्यांचा 'सिलिकॉन व्हॅली बँके'शी कोणताही संबंध नाही. आम्ही आमचे सदस्य, ग्राहक आणि इतरांना विनंती करतो की, त्यांनी अफवांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे.
सिलिकॉन व्हॅलीची पडझड जाणून घ्या....
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.