आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Silicon Valley Bank Closed; Impact India Startups | All You Need To Know | SVB Collapse

US च्या सिलिकॉन व्हॅलीला लॉक, चिंता मात्र भारतात:जाणून घ्या- सिलिकॉन बॅंकेला टाळे लागल्याने भारतीय स्टार्टअपवर काय होईल परिणाम

प्रताप अवचार15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेची आणखी एक मोठी बँक दिवाळखोरीत निघाली. अमेरिकेच्या नियामकांनी देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेली सिलिकॉन व्हॅली बँक बंद करण्याचे आदेश काढले. ही बॅंक यूएस मधील 16 वी सर्वात मोठी बँक आहे. बँकेची मालमत्ता $210 अब्ज आहे. पण अलीकडच्या काळात बँकेची आर्थिक स्थिती अशी झाली की, नियामकांना ती बंद करण्याचे आदेश द्यावे लागले.

बँकेला ठोकलेल्या टाळ्याचा परिणाम फक्त अमेरिकेतील लोकांनाच होणार नाही. तर जगभरात देखील त्याचा परिणाम होणार आहे. तर भारत देखील यापासून लांब नाही. त्याचा परिणाम शुक्रवारी शेअर बाजारात देखील पाहायला मिळाला. यात भारतीय गुंतवणूकदारांरही परिणाम होणार आहे. तसेच भारतीय स्टार्टअप्सचे भविष्य अंधारमय होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. चला तर जाणून घेऊया की, भारतीय स्टार्टअप्सवर या बॅंक बंदचा परिणाम काय होणार.... त्याचबरोबर स्टार्टअप म्हणजे नेमके काय असते, यावर देखील चर्चा करणार आहोत.

भारतीय गुंतवणूकदारांची चिंता वाढली
अमेरिकन बँक सिलिकॉन व्हॅली बँकेची मूळ कंपनी SVB फायनान्शियल ग्रुपचे शेअर्स 70 टक्क्यांपर्यंत घसरले. अमेरिकेत सुरू झालेल्या या बँकिंग संकटाचा परिणाम केवळ अमेरिकेपुरता मर्यादित नाही. भारतीय गुंतवणूकदार आणि भारतीय स्टार्टअप्सची चिंताही वाढू लागली आहे.

टेक स्टार्टअप्सना कर्ज देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या SVB फायनान्शियल ग्रुपच्या या संकटामुळे भारतीय स्टार्टअप्स संकटात आले आहे. खरे तर सिलिकॉन व्हॅली बँकेचा पैसा अनेक भारतीय स्टार्टअप्समध्ये गुंतवला गेला आहे. बँकेला लागलेल्या टाळ्याला फटका आता या स्टार्टअपवर पडणे निश्चित आहे.

भारतातील स्टार्टअप्सनी पैसे गुंतवले आहेत
सिलिकॉन व्हॅली बँकिंग संकटाचा परिणाम भारतीय स्टार्टअपवर दिसून येईल. या बँकेने भारतातील 20 स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. स्टार्टअप संशोधन सल्लागार Tracxn नुसार, 2003 मध्ये भारतीय स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली होती. यामध्ये नेमकी किती रक्कम गुंतवली गेली हे उघड झाले नसले तरी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतातील स्टार्टअप कंपन्यांनी सिलिकॉन व्हॅली बँकेकडून सुमारे $150 दशलक्ष भांडवल उभारले.

भारतातील सर्वात लक्षणीय गुंतवणूक SaaS-unicorn iSertis मध्ये आहे. याशिवाय, बँकेची Bluestone, Paytm, one97 Communications, PaytmMall, Naaptol, CarWale, Shaadi, InMobi आणि Loyalty Rewardz सारख्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक आहे. बँक बंद पडल्याने या गुंतवणूकदारांची चिंता वाढणार हे उघड आहे.

स्टार्टअप म्हणजे नेमकं काय ?
नवीन उद्योकाची किंवा व्यवसायाची सुरूवात करणे म्हणजे स्टार्टअप करणे म्हणता येते. मात्र, यामध्ये प्रायोजकाची नवीन संकल्पना असते. नवीन शोध असतो. किंवा नव्या संशोधनातून त्यावर काम करून नवीन उद्योग सुरू करणे म्हणजे स्टार्टअप. परंतू हे करत असताना नव उद्योजकाला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी फायनान्सर किंवा बॅंका त्याला मदत करतात. विशेष करून भारत सरकारच्या वतीने देखील विविध योजनांच्या माध्यमातून नवउद्योजकांच्या स्टार्टअपसाठी पुढाकार प्रेरणा व मदत दिली जात आहे.

SVB म्हणजे काय?
सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) ही कॅलिफोर्निया स्थित बँक आहे. जे टेक स्टार्टअपवर लक्ष केंद्रित करते.

SVB मध्ये काय होत आहे?
8 मार्च रोजी, SVB ने अहवाल दिला की त्याने बँकेच्या अनेक सिक्युरिटीज तोट्यात विकल्या आहेत. तसेच, त्याचा ताळेबंद मजबूत करण्यासाठी, $2.25 अब्ज किमतीचे नवीन शेअर्स विकण्याची घोषणा केली.

त्याचा परिणाम काय झाला?
त्यामुळे अनेक मोठ्या भांडवली कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि कंपन्यांनी त्यांचे पैसे बँकेतून काढून घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे बँकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली.

SVB संकट कसे वाढले?
बँक ऑफ अमेरिका, वेल्स फार्गो आणि जेपी मॉर्गन या प्रमुख यूएस बँकांचे शेअर्स किमान 5% घसरले. यामुळे त्यांच्या मार्केट कॅपमध्ये $80 अब्ज (6.6 लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त घसरण झाली. यानंतर आशियाई देशांच्या बँकांच्या शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळाली.

पुढे काय झाले?
सिलिकॉन व्हॅली बँकेला नियामकांनी बंद करण्याचे आदेश दिले होते. FDIC ने शुक्रवारी सिलिकॉन व्हॅली बँक ताब्यात घेण्याची घोषणा केली. FDIC ने सांगितले की बँकेकडे $209 अब्ज मालमत्ता आणि $175 अब्ज ठेवी आहेत.

हे ही वाचा

सिलिकॉन व्हॅली बुडाली:भारतीय स्टार्टअपचे अडचणीत, 60 स्टार्टअपमध्ये सुमारे 400 कोटी जमा, परंतू पैसे काढता येईना

सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) संकटामुळे 60 हून अधिक भारतीय स्टार्टअप आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. यापैकी 40 स्टार्टअप्स आहेत. ज्यांच्या 2 कोटी ते 8 कोटी रुपयांच्या ठेवी SVB बँकेत आहेत. आणि 20 स्टार्टअप्सच्या खात्यात 8 कोटींहून अधिक रक्कम जमा आहे. अशा प्रकारे या स्टार्टअप्सच्या बँकेत सुमारे 400 कोटी रुपये जमा आहेत. - येथे वाचा संपूर्ण बातमी

सिलिकॉन व्हॅली बॅंक संकटाचा शेअर बाजारावर परिणाम:अमेरिकन बाजार 2% घसरला, सेन्सेक्स 1.1% खाली, जाणून घ्या- काय म्हणाले तज्ज्ञ

अमेरिकन बँकिंग व्यवस्था अडचणीत सापडली आहे. अमेरिकेतील 16 वी सर्वात मोठी बँक सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) ला नियामकांनी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. FDIC आता बँक ठेवींचे संरक्षण करण्यासाठी जबाबदार आहे. बॅंकेचा शेअर जवळपास 70% घसरल्यानंतर याला व्यापार करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. SVB संकटामुळे केवळ अमेरिकाच नाही तर भारतासह इतर देशांच्या शेअर बाजारातही घसरण झाली आहे.​​​​​​​ - येथे वाचा संपूर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...