आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्या चांदीत असा राहीला आठवडा:सुरूवातीला अचानक स्वस्त झाले, नंतर पुन्हा महागले; वाचा- आगामी आठवड्यात काय होणार बदल

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर या आठवड्यात (दि. 5 ते 9) या कालावधीत सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. मात्र, भारतीय बाजारात सोन्याचा भाव अजूनही 51 हजारांच्या खालीच आहे. मात्र, गेल्या आठवड्याच्या तुलनेत त्यात वाढ झालेली आहे.

भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी (9 सप्टेंबर) सोन्याचा दर 50,779 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. सोन्याचा दर बुधवारी या आठवड्यात नीचांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, आठवड्याच्या अखेरीस सोन्याच्या दरात वाढ झाली. तर आगामी आठवडा सोन्या चांदीच्या बाजारात चढ उतार कायम राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

किती घसरला या आठवड्यातील सोन्याचा भाव

या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच सोमवारी दि.5 सप्टेंबर सोन्याचा भाव 50,784 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतीत वाढ झाली होती. मंगळवारी त्यात आणखी वाढ होऊन तो 50,865 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. बुधवारी त्याच्या दरात मोठी घसरण होऊन तो नीचांकी पातळीवर गेला. या दिवशी सोन्याचा भाव 50,422 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. यानंतर आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवस सोन्याचे दर वाढले आहेत. गुरुवारी सोन्याचा भाव 50,770 आणि शुक्रवारी 50,779 वर बंद झाला होता. मागील आठवड्याचा विचार केला तर या आठवड्यात (दि.5 ते 9) कालावधीत सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 309 रुपयांची वाढ झालेली आहे.

जागतिक बाजारात सोन्याच्या किमती वाढ

गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा भाव 50,470 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. या आठवड्यात जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर त्यात वाढ झाली आहे. जागतिक बाजारात सोन्याचा भाव 0.4 टक्क्यांनी वाढून $1,713.62 प्रति औंस झाला. रॉयटर्सच्या मते, यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.3 टक्क्यांनी वाढून $1,724.90 वर व्यापार करत होते.

कॅरेट निहाय सोन्याची किंमत घ्या जाणून

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 9 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,877 रुपये होता. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 50,673 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. सर्व प्रकारच्या सोन्याच्या कॅरेटची किंमत टॅक्स विना करण्यात आलेली आहे. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी केले तर त्यावर कर व्यतिरिक्त मेकिंग चार्जेस लागू होतात. त्यामुळे दागिन्यांच्या किमती वाढल्या आहेत.

मिस्ड कॉल द्या, सोन्याची किंमत जाणून घ्या

IBJA सरकारी सुटी वगळता शनिवार आणि रविवारी सोन्याचे दर जारी करत नाही. जर तुम्हाला वीकेंडमध्ये सोने खरेदी करायचे असेल तर तुमच्या फोनवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांच्या किरकोळ किमतीची माहिती उपलब्ध असेल. यासाठी तुम्हाला 8955664433 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...