आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:दिवाळीपर्यंत 60 हजार रुपयेकिलोपर्यंत जाऊ शकते चांदी, या तीन कारणांमुळे चांदीची चकाकी वाढेल

नवी दिल्ली, मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औद्योगिक मागणी आणि ग्रामीण बाजाराच्या खरेदीची होतेय मदत

गेल्या काही दिवसांत १० ग्रॅम सोन्याच्या तुलनेत स्वस्त झाल्यानंतर आता चांदीनेही वेग पकडायला सुरुवात केली आहे. गुरुवारी वायदेबाजारात चांदीचा भाव ५३ हजार रु. प्रतिकिलो पार गेली आहे. २०१३ नंतरची ही उच्च पातळी आहे. तज्ञांनुसार, चांदीतील तेजी आणखी काही महिन्यांपर्यंत सुरू राहील आणि दिवाळीपर्यंत ही ६० हजार रु. प्रतिकिलो पार होऊ शकते. सराफा तज्ञांनुसार जागतिक पातळीवर औद्योगिक मागणीसोबत देशात दागिन्यातही चांदीची मागणी या वेळी वाढू शकते. सोने महाग असल्याने ग्रामीण भागात चांदीच्या दागिन्यांत चांदीची मागणी वाढते. या वर्षी चांगले उत्पादन होण्याची आशा आहे, यामुळे गावांतील दागिन्यांच्या मागणीला मदत मिळेल. केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी “भास्कर’शी केलेल्या चर्चेत सांगितले की, २०१३ मध्ये जेव्हा चांदीचा भाव ५०,००० रुपयांवर उसळला होता तेव्हा सोने आणि चांदीचा भाव ५०,००० रुपयांवर उसळला होता. तेव्हा सोने आणि चांदीच्या भावाचे प्रमाण घटून ३१वर आले होते. या वर्षी मार्चमध्ये हे प्रमाण ऐतिहासिक उंची १२७ वर गेले होते. मात्र, पुन्हा हे प्रमाण घटून ९६ च्या जवळ आले होते. यामुळे यातून संकेत मिळतो की, सोन्याऐवजी चांदीत गुंतवणूकदारांचा कल वाढत आहे. सिल्व्हर इन्स्टिट्यूटच्या आधारानुसार, २०२० च्या पहिल्या सहामाहीत चांदीच्या गुंतवणुकीतील मागणीत १० टक्के वाढ झाली आहे. चांदीची औद्योगिक मागणी अवश्य कमी राहिली. मात्र, मेपासून याच्या औद्योगिक मागणीही वाढली आहे. केडिया यांनी सांगितले की, दिवाळीपर्यंत हा भाव ६२,००० रु. प्रतिकिलोपर्यंत पोहोचू शकतो. दुसरीकडे, एंजेल ब्रोकिंगचे डेप्युटी व्हाइस प्रेसिडेंट अनुज गुप्ता यांनी सांगितले की, चांदीच्या दागिन्यांत सर्वात जास्त मागणी गावांतून येते. या वेळी मान्सून चांगला राहण्याच्या अपेक्षेने याच्या मागणीत वाढ होईल. याशिवाय सोन्याच्या उच्च किमतींमुळे अनेक लोक या वेळी सणात सोने खरेदी करणार नाहीत. त्यांच्यासाठी सोन्यानंतर दुसरा पर्याय चांदीचा आहे. या कारणास्तव चांदीची मागणी वाढेल. गुप्ता म्हणाले, या दिवाळीपर्यंत चांदी ६० हजार रुपये प्रतिकिलोची पातळी स्पर्श होऊ शकते. त्यांनी सांगितले की, दिवाळीत चांदी ५८ ते ६० हजारांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

या तीन कारणांमुळे चांदीची चकाकी वाढेल

1. सोन्याच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाल्याने सोन्याची ग्राहकी घटली आहे.

2. चांदीच्या दागिन्यांची सर्वात अधिक मागणी गावांतून होते. या वेळी चांगल्या उत्पादनाने गावांतील मागणीत वाढ होईल.

3. लॉकडाऊनमध्ये औद्याेगिक उत्पादन ठप्प झाल्याने चांदीची औद्योगिक मागणी बंद आहे. आता ही पुन्हा वेग घेईल.

चांदीची मागणी पुरवठ्याच्या तुलनेत कमी

जागतिक चांदी सर्वेक्षण २०२० नुसार २०१९ मध्ये चांदीचा पुरवठा मागणीच्या तुलनेत ९७३ टन कमी होता. दुसरीकडे, २०२० मध्ये चांदीच्या खाणीतून पुरवठा सात टक्के कमी होईल, असा सिल्व्हर इन्स्टिट्यूटचा अंदाज आहे. मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा चांदीच्या किमतींना प्रोत्साहन देत आहेत.