आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याच्या मार्गावर चांदी:एका दिवसात 2,417 रु. चांदी महाग, 73,617 रु.च्या विक्रमी पातळीवर

मुंबई/ जयपूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एमसीएक्समध्ये 76,300 रु. प्रतिकिलोच्या उंचीवर

सोन्याप्रमाणेच चांदीमध्येही तेजीचा कल कायम आहे. मुंबईच्या सराफा बाजारात गुरुवारी चांदी २,४१७ रु. महाग झाली आणि याची किंमत वाढून ७३,६१७ रु. प्रति किलोच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. बुधवारी याची किंमत ७१,२०० रु. प्रति किलो होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए)च्या आकड्यांतून ही माहिती समोर आली. दुसरीकडे, जयपूरमध्ये चांदीने सव्वानऊ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. याची किंमत ७४,२०० रु. प्रति किलोवर पोहोचली. याआधी २९ एप्रिल, २०११ रोजी जयपूरमध्ये ही ७२,००० रु. किलोने विकत होती. या वर्षी १७ मार्चनंतर जयपूरमध्ये १४२ दिवसांत चांदी ७६,३०० रु. प्रति किलोच्या उंचीला स्पर्श केला. एमसीएक्सवर सव्वानऊ वर्षांपूर्वी चांदी ७६,६०० रुपयांच्या पातळीवर पोहोचली होती. जयपूरच्या सराफा ट्रेडर्स कमिटीचे अध्यक्ष कैलाश मित्तल म्हणाले, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीसाठी मागणी आणि उत्पादनात घट आल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सात वर्षांची उंची २८.५४ डॉलर प्रति औंसवर पोहोचल्याने हजर बाजारात चांदीने नवीन विक्रम स्थापन केला. या वर्षी १ जानेवारी रोजी चांदी ४७,५०० रु. प्रति किलो होती. या हिशेबाने २०२० मध्ये आतापर्यंत चांदी २६,११७ रु.(५५%) प्रति किलो महाग झाली आहे.

किंमत वाढीचे कारण

> सप्टें. २०१६ नंतर चांदी प्रथम २८ डॉलर प्रति औंसने निघाली

> लॉकडाऊन उघडल्याने औद्योगिक मागणी आणखी वाढण्याची आशा

> सुरक्षित गुंतवणुकीसाठी चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी

> कोरोनामुळे जगात २७५ खाणींवर परिणाम

> चांदीची पुरवठा साखळी खंडित होण्याची शक्यता

किमती वाढल्याने हजर व्यवसायावर परिणाम

कोरोना संसर्गामुळे जागतिक अर्थव्यवस्था सुधारणेची शक्यता कमी झाल्याने चांदी आंतरराष्ट्रीय बाजारात २०१२ नंतर सर्वात उंच पातळीवर पोहोचली आहे. सध्या यामध्ये घट येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत चांदीचा हजर व्यवसाय घटण्याची शक्यता आहे. बाजारातून खरेदीदार गायब झाले आहेत. - मातादीन सोनी, महामंत्री, सराफा ट्रेडर्स कमिटी, जयपूर

बातम्या आणखी आहेत...