आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचालू महिन्यात २ तारखेला शुद्ध सोन्याचे दर ५१,७०० ( तीन टक्के जीएसटी अतिरिक्त) रुपये प्रति दहा ग्रॅमवर होते जे अक्षय्य तृतीयेला (३ मे) रोजी ५१,३०० रुपयांपर्यंत आले होते ते गुरुवारी १२ मे रोजीही कायम आहेत. दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र या काळात मोठी घसरण पाहायला मिळाली असून २ मे रोजी चांदीचे दर ६७,००० (तीन टक्के जीएसटी अतिरिक्त) रुपये प्रतिकिलो होते. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ते ५०० रुपयांनी घसरून ६६,५०० रुपयांवर गेले आणि १२ मे रोजी ५००० रुपयांनी त्यात घट होऊन ६१,५०० रुपयांवर पोहोचले आहेत. लग्नसराई सुरू होत असल्याने सोने-चांदीचे हे कमी झालेले दर सामान्यांना काही अंशी दिलासा देणारे ठरणार आहेत.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध झाल्यानंतर सोने, चांदीच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत होती. मात्र ८ मार्चनंतर युद्धाचा जाेर कमी झाल्याचा परिणाम म्हणून हे दर कमी होण्यास सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, युद्धाच्या सुरुवातीच्या काळात सोन्याचे दर २५०० रुपयांपर्यंत तर चांदीचे दर ८५०० रुपयांपर्यंत वाढले होते. मात्र, युद्धाचा जाेर ओसरू लागल्याने दर कमी होत आहेत. विशेष म्हणजे, दर वाढल्याने चढ्या दरांचा फायदा घेत अनेकांनी सोन्याची माेड केल्याचे दिसून येत होते.
असे झाले दर कमी (३ टक्के जीएसटी अतिरिक्त)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.