आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने घोषणा केली आहे की, अमेरिकेतील प्रायवेट इक्विटी फर्म सिल्वर लेकने रिलायंस रिटेल वेंचर्स लिमिटेड (RRVL) मध्ये 7,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या बदल्यात सिल्वर लेकला रिलायंस रिटेलमध्ये 1.75 टक्के भागीदारी मिळणार आहे. यापूर्वी सिल्वर लेकने रिलायंसच्या जियो प्लेटफॉर्म्समध्येही गुंतवणू केली आहे.
लाखो जणांना होईल फायदा- अंबानी
सिल्वर लेकसोबत झालेल्या या डीलवर रिलायंस इंडस्ट्रीजचे चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, मुकेश अंबानी म्हणाले की, "सिल्वर लेकसोबत झालेल्या पार्टनरशिपमुळे मला खूप आनंद होत आहे. यातून लाखो लोकांसोबतच लहान व्यापाऱ्यांनाही फायदा होईल. "
रिलायंस रिटेलची व्हॅल्यू 4.21 लाख कोटी रुपये ठरवण्यात आली
रिपोर्टनुसार, सिल्वर लेकची ही गुंतवणूक रिलायन्स रिटेलच्या 4.21 लाख कोटींच्या किंमतीच्या आधारे केली जात आहे. मुकेश अंबानी आपल्या रिलायंस रिटेलमधील 10 टक्के भाग विकण्याच्या विचारात आहेत. ही विक्री नवीन शेअर्सच्या रुपात केली जाईल. परंतू, अद्याप सिल्वर लेक आणि रिलायंस इंडस्ट्रीजने यावर कोणतीच प्रतिक्रीया दिली नाही.
रिटेल व्यवसायात प्रवेश करण्याच्या तयारीत अंबानी
तेल ते दूरसंचार व्यवसायाचा व्यवसाय करणारे रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष मुकेश अंबानी भारतात रिटेल व्यवसायात प्रवेश करण्याची तयारी करत आहेत. मुकेश अंबानी या विस्तारासाठी संभाव्य गुंतवणूकदार शोधत आहेत. मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, अमेरिकेतील रिटेल दिग्गज वॉलमार्ट इंकसुद्धा रिलायन्स रिटेलमध्ये हिस्सा खरेदी करण्याच्या विचारात आहे. वॉलमार्ट इंकने 2018 मध्ये भारतातील ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला खरेदी केले आहे.
रिलायन्स रिटेल आणि फ्यूचर ग्रुपने 24713 कोटींचा व्यवहार केला
रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड (आरआरव्हीएल) फ्यूचर समूहाचा रिटेल आणि होलसेल व्यवसाय तसेच, लॉजिस्टीक्स अँड वेअरहाउसिंग व्यवसाय घेणार आहे. यातून रिलायंस, फ्यूचर ग्रुपचा बिग बाजार, ईजीडे आणि FBB चे 1,800 पेक्षा जास्त स्टोर्सपर्यंत पोहचेल. ही डील 24713 कोटी रुपयांमध्ये ठरली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.