आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Silver Will Go Up To 80,000 This Year; Currently Priced Below 70 Thousand; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सराफ्यातील कल:यंदा 80 हजारांपर्यंत जाईल चांदी; सध्या 70 हजारांखाली किंमत; आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 33% वाढू शकते

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2021 मध्ये चांदी सरासरी 27.30 डॉलर प्रति औंस राहील : सिल्व्हर इन्स्टिट्यूट

या वर्षी देशात चांदीची किंमत सर्व विक्रम मोडू शकते. डिसेंबर २०२१ पर्यंत चांदी ८०,००० रु. प्रतिकिलोची पातळी पाहू शकते. शुक्रवारी चांदीची किंमत ६९,१५२ रु. प्रतिकिलो राहिली. देशातील बाजारात आतापर्यंत चांदी ७५,७०० रुपयांवर गेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या भावात उसळी येण्याची शक्यता आहे. याअंतर्गत देशातील बाजारात याची चकाकी वाढण्याची शक्यता आहे. द सिल्व्हर इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, २०२१ च्या उर्वरित महिन्यांत चांदीची किंमत ३३ टक्क्यांपर्यंत उसळून सरासरी २७.३० डॉलर प्रतिऔंस(२८.३५ ग्रॅम) होण्याची शक्यता आहे. यादरम्यान किंमत ३२ डॉलर प्रतिऔंसच्या उच्च पातळीवरही पोहोचू शकते.

जागतिक चांदी बाजार २०२० मध्येही तेजीत होता. २०२० मध्ये चांदीचा भाव २०१९ च्या तुलनेत २७ टक्के वाढला होता. या वर्षी कमीत कमी ३०% उसळीची शक्यता आहे. कोविड महारोगराई रोखण्यासाठी लावलेल्या कठोर निर्बंधांमुळे गेल्या वर्षी चांदीची मागणी घटली होती. मात्र, या वर्षी मागणी वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये गेल्या वर्षीच्या थकीत मागणीचा समावेश आहे. फॅक्टसेटच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०१३ पासून आतापर्यंत चांदी कधीही ३० डॉलरवर गेली नाही. सिल्व्हर इन्स्टिट्यूटच्या अंदाजानुसार, या वर्षी हा विक्रम मोडीत निघेल.

भाव वाढतील, मात्र मागणी कमकुवत राहील
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे(आयबीजेए) राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी सांगितले की, नव्या तंत्रज्ञानात चांदीचा वापर वाढल्याने जागतिक बाजारात याची मागणी कमकुवत आहे. किमती वाढल्यावर मागणी आणखी कमी होण्याची शक्यता आहे. सध्या चांदीची अधिकृत किंमत प्रति ३०-४० सेंट(१,०००-१५,०० रु.) प्रतिकिलो सूट चालू आहे. पुढील स्थिती देशातील कोरोना महारोगराईवर अवलंबून असेल.

देशातील बाजारातही चमक वाढणार
भारत चांदीसाठी आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात याच्या किमती वाढण्याचा थेट परिणाम किमतीवर होतो. पृथ्वी फिनमार्टचे संचालक मनोज जैन म्हणाले, ज्या पद्धतीने डॉलर निर्देशांक खाली येत आहे आणि चांदीची औद्योगिक मागणी वाढत आहे, ते पाहता २०२१ मध्ये ही ८०,००० रु.च्या पातळीला स्पर्श करू शकते.

बातम्या आणखी आहेत...