आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोने-चांदी:नव्या वर्षात सोन्यापेक्षा चांदी होईल वरचढ; 85 हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यताही कारणे चांदीच्या जमेची

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी सोने परताव्याच्या बाबतीत भलेही बहुतांश पर्यायांवर भारी पडत असेल, मात्र पुढील वर्षात चांदी पिवळ्या धातूवर वरचढ ठरत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चांदीच्या बाजूने तेजीमुळे परिस्थिती तयार होत आहे. यामुळे चांदी नव्या वर्षात सोन्याच्या तुलनेत जास्त उसळत ८५ हजार रु. प्रतिकिलोच्या पातळीवर जाऊ शकते. सोने नव्या वर्षात ५५ ते ६० हजार रु. प्रति १० ग्रॅमदरम्यान राहू शकते. केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणाले, मार्चमध्ये सोने-चांदी प्रमाण ११२.९३ च्या विक्रमी पातळीवर होते. तेव्हापासून यामध्ये घट येत आहे. आता हा आकडा ७६.६० आहे. मात्र, अद्यापही १० वर्षांच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. केडिया म्हणाले, सोने-चांदी प्रमाण पडणे सांगते की, अर्थव्यवस्थेत अनिश्चितता कमी होत आहे व आर्थिक हालचाली वाढत आहेत.

आर्थिक हालचाली वाढल्यास औद्योगिक हालचालीही वाढतील. यामुळे चांदीच्या मागणीत वाढ होईल. केडिया म्हणाले, आम्हाला आशा आहे की, नव्या वर्षात सोने-चांदी रेशो ६३ च्या जवळपास जाईल. त्यामुळे चांदीच्या किमती वाढून ८५ हजार ते ९० हजार प्रतिकिलो होऊ शकते. एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष (रिसर्च) अनुज गुप्ता यांनी सांगितले की, औद्योगिक उत्पादन वाढल्याने चांदीच्या किमती वाढतील.

ही कारणे चांदीच्या जमेची
- औद्योगिक मागणी : चांदीचा वापर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये होतो. गेल्या पाच वर्षांत चांदीची औद्योगिक मागणी वाढली आहे. कोरोना लसीनंतर जगभरात औद्योगिक उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे चांदीची मागणी वाढेल आणि या पांढऱ्या धातूच्या किमतीत वाढ होईल.

- सोन्याच्या तुलनेत कमी किंमत : चांदीच्या तुलनेत सोन्याच्या किमती २०२० मध्ये जास्त वाढल्या आहेत. दहा वर्षांची सरासरी पाहिल्यास सोने आणि चांदीचे प्रमाण ६२ चे राहिले आहे. हे सध्या ७६ पेक्षा अधिक आहे. म्हणजे चांदीच्या किमती आणखी वाढतील.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser