आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Since 1999, The Stock Market Has Generally Gone Up In Two Months, With Huge Gains From The Stock Market In November December

22 वर्षांपासून हाच कल:नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शेअर बाजारातून भरपूर कमाई, 1999 पासून, साधारणपणे दोन महिन्यांत चढला बाजार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर उत्तम ठरू शकतात. दोन दशकातील आकड्यावरुन असेच चिह्न दिसत आहेत की, वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यात शेअर बाजाराचा सरासरी परतावा इतर महिन्यापेक्षा जास्त राहतो. दुसरीकडे जानेवारी-मार्चदरम्यान देशांतर्ग बाजार सामान्यपणे नकारात्मक परतावा देत असतात. म्हणजेच या दरम्यान गुंतवणूकदार नुकसान झेलत असतात. स्टॉक तज्ञ आणि आर्थिक शिक्षण सेवा माध्यम ट्रेड ब्रेन्सच्या मते, गेल्या २२ वर्षापासून देशांतर्गत शेअर बाजाराने डिसेंबरमध्ये सर्वात जास्त २.८५% सरासरी परतावा दिला आहे. २.७०% सरासरी परताव्यासह नोव्हेंबर याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या उलट जानेवारी ते मार्चदरम्यान शेअर गुंतवणूकदारांना सरासरी ०.२४% तोटा सोसावा लागला.

दाेन दिवसांनंतर परतली तेजी देशांतर्गत बाजारात घसरण शुक्रवारी संपली. सेन्सेक्स ११४ अंकांच्या वाढीसह ६०,९५० वर बंद झाला आणि निफ्टी ६४ अंकांनी वाढून १८,११७ वर बंद झाला. सेन्सेक्स ९९० अंकांनी तर निफ्टी ३३० अंकांनी वाढला. २८ ऑक्टोबर रोजी ते अनुक्रमे ५९,९६० आणि १७,७८७ च्या पातळीवर होते.

या वर्षीदेखील चांगली स्थिती वर्षीही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये देशांतर्गत शेअर बाजार जोरदार परतावा देऊ शकतो. याची चिन्हे दिसू लागली. एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार, २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात २४,५५२ कोटींची गुंतवणूक केली. १९९९ पासून आतापर्यंत वार्षिक १६% परतावा शेअर बाजाराच्या आंकड्याच्या मते, बेन्चमार्क इंडेक्स निफ्टी ५०ने वर्षे १९९९ पासून २०२१ पर्यंत वार्षिक १५.९१% सरासरी परतावा दिला आहे. तथापि, चलनवाढ, वाढते व्याजदर आणि रशिया-युक्रेन संकटामुळे यंदाचा परतावा सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची अपेक्षा आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तेजीचे मोठे कारण

1.परदेशी संस्थागत गुंतवणूकदार सहसा वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांत खरेदी करतात 2. २५ डिसेंबरपर्यंत म्हणजेच ख्रिसमसपर्यंत विदेशी गुंतवणूकदारांचा कल सकारात्मक राहील 3. वर्षाच्या शेवटी, फेडरल रिझर्व्ह पुढील वर्षासाठी धोरण सूचित करते. (विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस यांच्या मते)

बातम्या आणखी आहेत...