आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नफारूपी विक्री:घसरल्यानंतर सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवारच्या घसरणीनंतर गुरुवारी सकाळी फेडरल बँकेच्या बैठकीच्या निकालांमुळे देशाच्या शेअर बाजारांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पण दुपारनंतर रिअॅल्टी, फार्मा आणि सार्वजनिक बँकांच्या समभागांची जाेरदार नफारूपी विक्री सुरू झाली. त्यामुळे निफ्टी रिअॅल्टी निर्देशांक आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक निर्देशांक अनुक्रमे १.६ आणि ०.७ टक्क्यांनी घसरले.

तथापि, निफ्टीच्या आयटी आणि मेटल उपनिर्देशांकांमध्ये अनुक्रमे २.०७% आणि ६.६२ % वाढ झाली. पण संध्याकाळपर्यंत बाजाराने सुरुवातीची कमाई गमावली आणि व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स ३३.२० अंकांच्या किरकोळ वाढीसह ५५,७०२.२३ अंकांवर आणि निफ्टी ५.०५ अंकांच्या किरकोळ वाढीसह १६,६८२.६५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.तज्ज्ञांच्या मते, वाढत्या महागाईमुळे गुंतवणूकदार जोखीम घेणे टाळत आहेत, तर एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोक बाजारातून पैसे काढत आहेत. बाजारात खरेदी आणि विक्रीचे दोन्ही सौदे दिसून येत आहेत. जवळपास सर्व प्रमुख घटना पार पडल्यानंतर आता बाजाराचे पुन्हा कंपन्यांच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जोपर्यंत निफ्टी १६,८५० च्या खाली राहील तोपर्यंत त्यात घसरण होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...