आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबँक ठेवीच्या तुलनेत पोस्ट ऑफिसची अल्पबचत ठेव योजना जास्त वेगाने लोकप्रिय होत आहेत. गेल्या पाच वर्षात अल्पबचत ठेवी दुप्पट, तर बँकेतील ठेवी दीडपट वाढल्या आहेत. जास्त व्याजदर याचे सर्वात मोठे कारण ठरले आहे. बँक ऑफ बडोदाच्या एका अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अल्पबचत ठेवी आणि बँकेच्या ठेवीचे प्रमाण ४.४% होते, जे २०२१-२२ मध्ये वाढून ५.८% झाले. दरम्यान एकूण ठेवीची छोटी बचत योजनेची भागीदारी कमी झाली नाही. बँका ठेवी वाढवण्यासाठी आक्रमक मोहीम राबवत असताना ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अहवालानुसार, फेब्रुवारी २०२२ पर्यंत बँकांत एकूण ठेवी १७०.२ लाख कोटी रुपये होते. त्याच्या तुलनेत अल्पबचत ठेवीचा आकडा फक्त ९.९ लाख कोटी रुपये होता. गेल्या पाच वर्षात बँक ठेवी जेथे ५५.४ लाख कोटी रुपये वाढले, दुसरीकडे अल्पबचत ठेवींमध्ये फक्त ४.६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
२०१६-१७ या आर्थिक वर्षापासून अल्पबचत योजनांची लोकप्रियता वाढतेय
२०१६-१७पासून म्हणून लोकप्रिय होत आहेत अल्पबचत योजना
जास्त व्याजदर : बचत ठेव : आर्थिक वर्ष २०१६-१७ पर्यंत बँका आणि पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनेचे सरासरी व्याजदर ४% होते. मात्र २०२१-२२ येता-येता बँकांच्या सरासरी ठेव दर कमी होऊन २.७% राहिले, तर पोस्ट ऑफिसचे दर ४% वर स्थिर राहिले. मुदत ठेव : २०१६-१७ मध्ये एका वर्षाची मॅच्युरिटी असलेल्या बचत योजनेसाठी बँक आणि पोस्ट ऑफिस, दोन्ही ६.८% व्याजदर होते. सहज उपलब्ध : बँक ऑफ बडोदाच्या रिसर्च अॅनालिस्ट अदिती गुप्ता यांनी सांगितले, देशात एकूण १.५६ लाख टपाल कार्यालये आहेत. यापैकी १.४६ लाख (९०%पेक्षा जास्त ग्रामीण भागात आहेत. एकूण १.५१ लाख बँक ब्रँचपैकी फक्त ५३,३८० (३५%) ग्रामीण भागात आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.