आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुभवातून धडा:देय रकमेचे ईएमआयमध्ये रूपांतर करताहेत स्मार्ट क्रेडिट कार्डधारक

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनादरम्यान मिळालेल्या अनुभवातून धडा घेत क्रेडिट कार्डधारक स्मार्ट झाले आहेत. बँकर्सचे म्हणणे आहे की, मोठ्या संख्येत लोक क्रेडिट कार्डवरील देय देय रकमेचे ईएमआयमध्ये रूपांतर करत आहेत. त्यामुळेच महामारीच्या आधी क्रेडिट कार्डवर थकबाकीमध्ये फिरत्या क्रेडिटचा हिस्सा ४०-४५% असायचा. आता त्यात १०% घट होत आहे. एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सेवेच्या क्रेडिट कार्ड्सवर होणाऱ्या एकूण मिळणाऱ्या रिव्हॉल्व्हिंग क्रेडिटचा हिस्सा डिसेंबर २०२२ च्या तिमाहीत ३% ते २४% कमी झाला. एका वर्षांआधी समान तिमाहीत हे २७% च्या पातळीवर होते दुसरीकडे, याच कालावधीत कंपनीच्या एकूण थकबाकीत ईएमआयतून येणारे पेमेंटचा हिस्सा ४% वाढून ३७% पर्यंत पोहोचला. तो एका वर्षांपूर्वी याच तिमाहीत ३३%च्या पातळीवर होता. तज्ञांच्या मते, लोकांना समजू लागले की, वेळेवर ईएमआय भरल्याने त्यांचा सिबिल स्कोअर सुधारतो.