आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Softbank Loses More Than Rs 1 Lakh Crore Due To Investments In Companies Like Weaver And Uber

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:वीवर्क, उबरसारख्या कंपन्यांमधील गुंतवणुकीमुळे सॉफ्टबँकेला सव्वा लाख कोटी रुपयांवर नुकसान

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • जपानी गुंतवणूक फर्म सॉफ्टबँकेला 39 वर्षांत पहिल्यांदा मोठा तोटा झाला

कोरोना संकटामुळे जपानी सॉफ्टबँक समूह मोठ्या संकटात सापडला आहे. स्टार्टअप्समध्ये गुंतवणुकीसाठी उभारण्यात आलेल्या व्हिजन फंड व्यवसायाचे गेल्या आर्थिक वर्षात १.९ ट्रिलियन येन ( १७.७ अब्ज डॉलर किंवा १ लाख ३२ हजार कोटी रुपये) चे नुकसान झाले आहे. वीवर्क आणि उबरमध्ये केलेली गुंतवणूक या नुकसानीचे कारण मानले जात आहे.समूहाने सोमवारी या संदर्भात माहिती दिली. यानुसार, कंपनीने मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात १.३६ ट्रिलियनचा तोटा आणि ९६१.६ बिलियन येनचा निव्वळ तोटा नोंदवला. कंपनीच्या ३९ वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात मोठा तोटा आहे. सॉफ्टबँकेचे संस्थापक मासायोशी सोन यांनी १०० बिलियन डॉलरचा ‌व्हिजन फंड उभारला होता. गेल्या वर्षी मे महिन्यात उबरच्या निराशाजनक पदार्पणानंतर सप्टेंबरमध्ये वीवर्कचे नुकसान झाले होते. तरीही सॉफ्टबँकने इकॉनॉमी शेअरिंगच्या नावाखाली बचाव केला. मात्र आता या कोरोना विषाणूमुळे कंपन्यांनाही खूप त्रास सहन करावा लागला आहे. सोन म्हणाले, स्थिती अतिशय वाईट आहे. आम्ही गुंतवणूक केलेल्या क्षेत्रावर कोरोनामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. मात्र यात लवकर सुधारणा होईल, अशी आम्हाला आशा आहे.सॉफ्टबँकनुसार, उबरच्या समभागातील घसरणीमुळे व्हिजन फंडचे ५.२ बिलियन डॉलरचे नुकसान झाल. वीवर्कमुळे ४.६ बिलियन डॉलर व इतर कंपन्यांमुळे ७.५ बिलियन डॉलर नुकसान झाले.जॅक मांचा सॉफ्टबँकेच्या संचालक पदाचा राजीनामा : चीनची दिग्गज ई-कॉर्मस कंपनी अलिबाबाचे सह-संस्थापक जॅक मा यांनी जपानच्या सॉफ्टबँक समूहाच्या संचालक मंडळावरीला पदाचा राजीनामा दिला आहे. ते १३ वर्षांपासून सॉफ्टबँक समूहासोबत काम करत होते. बँकेने सोमवारी ही माहिती दिली. कर्जाच्या ओझ्याखालील सॉफ्टबँँकेने राजीनाम्याचे कारण सांगितले नाही. मात्र वीवर्कमधील सॉफ्टबँकेच्या जोखीमपूर्ण गुंतवणुकीमुळे मा यांनी राजीनामा दिल्याचे सांगण्यात येते.

भारतातही नुकसान :

भारतीय स्टार्टअप आणि युनिकॉर्न कंपनी ओयोचेही मोठे नुकसान झाल्याची बातमी आहे. ओयोमध्ये सॉफ्टबँकेने सुमारे १.५ बिलियन डॉलरची गुंतवणूक केली होती. या कंपनीने गेल्या महिन्यात दुसऱ्या देशांमधील कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. सॉफ्टबँकेने भारतात फ्लिपकार्ट, ओला, पेटीएम, स्नॅपडील, ओयो रूम्स, इन मोबीसारख्या कंपन्या व स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. बँकेने २०१८ पर्यंत भारतात २४ डील आणि इतर ३९ कंपन्यांमध्ये ५३ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...