आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Volvo XC 40 Recharge EV:बुकींग सुरू होताच दोन तासात कारची विक्री, एकदा चार्जींग केल्यावर 418 km पर्यंत धावणार

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत वाढत आहे. या वर्षात आत्तापर्यंत १.२२ लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. एकंदरीत हे चित्र पाहता आता अनेक लक्झरी ब्रॅंडच्या कारही भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक कार लॉन्च करित आहेत. 26 जुलै रोजी व्होल्वो इंडियाने भारतात असेंबल्ड XC40 रिचार्ज इलेक्ट्रिक SUV लाँच केली आहे. 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर बुकिंग सुरू होताच दोन तासात सर्व कार विक्री झाल्या आहेत.

कंपनीकडून सांगण्यात आले की, भारतीय बाजारात व्होल्वो XC40 रिचार्जचे सर्वच म्हणजे 150 युनिट्स दोन तासात विक्री झाले आहेत. सदर कार ऑक्टोंबर-2022 मध्ये प्रत्यक्ष ग्राहकांना दिली जाईल. व्होल्वो इंडिया ही स्वीडिश कंपनीसोबत काम करते, डिसेंबर 2022 पर्यंत Volvo XC40 रिचार्जची सर्व 150 युनिट्स वितरित करण्याचे नियोजन केले जात आहे. तसेच या लक्झरी इलेक्ट्रिक एसयुव्हीचे बुकिंग अद्याप सुरू आहे. परंतू त्यांची डिलिव्हरी यावर्षी होणार नाही. या वर्षी होणाऱ्या डिलिव्हरींचे बुकिंग आधीच झाले आहे.

किंमत 55.90 लाखांपासून सुरू
XC40 रिचार्ज हे भारतात असेम्बल केलेले पहिले लक्झरी इलेक्ट्रिक वाहन आहे. हे कर्नाटकातील बेंगळुरूजवळील कंपनीच्या होसाकोट प्लांटमध्ये तयार करण्यात आली. हे लक्षात घेण्यासारखे आहे. नवीन Volvo XC40 रिचार्ज 55.90 लाख रुपये, एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. ही देशातील सर्वात स्वस्त लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही बनली आहे.

कमाल वेग 180 किमी. प्रतितास

दोन इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आल्या आहेत. ज्या 402 Bhp पॉवर (एकत्रित) आणि 660 Nm पीक टॉर्क जनरेट करतात. ही इलेक्टिक एसयूव्ही 4.9 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते. तर तिचा टॉप स्पीड 180 किमी प्रतितास आहे.

40 मिनिटांत 80 टक्के चार्जिंग
XC40 रिचार्ज 78kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक करते. एका चार्जवर (WLTP सायकल) ४१८ किमीची रेंज देऊ शकते असा वोल्वोचा दावा आहे. 150kW DC फास्ट चार्जरच्या मदतीने हे फक्त 40 मिनिटांत 0-80 टक्के चार्ज केले जाई शकते. त्याचवेळी, ते मानक 11kW एसी चार्जरवर आठ तासांत चार्ज होईल.

बातम्या आणखी आहेत...