आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Soon After The Impact Of The Festive Season, Companies Will Increase Their Advertising Spend By 10%

जाहिरात खर्च वाढणार:लवकरच सणासुदीचा प्रभाव, कंपन्या जाहिरात खर्च 10 % वाढवणार

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांनंतर सणासुदीवरून कोरोनाचे सावट दूर झाले. त्यामुळे बाजारात उत्साह दिसून येत आहे. ब्रँड जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपन्यांनी कबंर कसली. जाहिरातीचे बजेट ८ ते १० टक्के वाढवण्याची योजना आखत आहेत. देशात ऑगस्ट-सप्टेंबरपासून ते डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या सणासुदीच्या काळात वर्षाची सुमारे एक तृतीयांशपेक्षा जास्त विक्री होते.

यंदा कंपन्या जोरदार विक्रीची अपेक्षा करत आहेत. त्यामुळे त्यांनी जाहिरातीचे बजेट वाढवलेे. ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, फिनटेक, ऑटोमोबाइल, बँक, विमा कंपन्या, दागिने ब्रँड आणि रिअल इस्टेट डेव्हलपर्सचा यात समावेश आहे.

जेनिथ मीडिया संशोधनाच्या एका अहवालानुसार, यंदा सणासुदीत जाहिरातीवर २५-३० हजार कोटी रुपये खर्च होणार. यापैकी सुमारे ४५०० ते ५००० कोटी रुपये प्रिंट मीडियाच्या जाहिरातींवर खर्च केले जाणार आहेत. देशातील जाहिरात बाजार ९१.५ हजार कोटींचा आकडा गाठू शकतो.

बातम्या आणखी आहेत...