आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पाइसजेटने आपला कार्गो आणि लॉजिस्टिक विभाग असलेल्या स्पाइस एक्सप्रेस वेगळे युनिट बनवण्याचे काम पूर्ण केले आहे. यामुळे कंपनीसाठी स्वतंत्रपणे निधी गोळा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्पाइसजेटने आपल्या कार्गो व्यवसायाच्या विकासासह आपल्या ग्राहकांना जास्त चांगली सेवा देण्यासाठी असे केले आहे. हे विभाजन 1 एप्रिलपासून लागू झाले आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्येही 3% वाढ झाली.
निगेटिव्ह नेटवर्थ कमी होईल
एअरलाइनने सांगितले की या पावलामुळे स्पाइसजेटला एकरकमी 2,555.77 कोटींचा फायदा होईल आणि त्यांची निगेटिव्ह नेटवर्थ कमी होईल. हाइव्ह ऑफ याची बॅलन्स शीटही मजबूत करेल. स्पाइसजेट बोइंग 737s, Q-400s आणि मालवाहू जहाज ऑपरेट करते. स्पाइस एक्सप्रेस आणि लॉजिस्टिक प्रा. लिमिटेड ही स्पाइसजेट लिमिटेडची सहायक कंपनी आहे, जी कार्गो आणि डिलिव्हरी सेवेसाठी आहे.
विभाजन आपल्या ग्रोथ स्टोरीचे महत्वाचे पाऊल
स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह म्हणाले, 'आमची कार्गो आणि लॉजिस्टिक आर्म वेगळी होणे आमच्या ग्रोथ स्टोरीतील एक महत्वाचे पाऊल आहे, जे येणाऱ्या काळात समोर येईल. स्पाइस एक्सप्रेस कार्गो आणि लॉजिस्टिक बिझनेसवर जास्त आणि वेगळा फोकस यामुळे करता येईल.'
सिंह म्हणाले की, स्पाइस एक्सप्रेस वेगळी करण्याचा निर्णय एअरलाइनच्या लॉन्ग टर्म बिझनेस प्लॅननुसार घेण्यात आला आहे. यामुळे लॉजिस्टिक्स व्यवसायाचे मूल्यांकन वाढू शकेल. ते म्हणाले. 'स्पाइसजेट आणि स्पाइस एक्सप्रेस दोन्हींमध्ये अनेक शक्यता आहेत. व्यवसायाच्या विकासाला गती देण्यासाठी निधी गोळा करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.'
शेअर्समध्ये 3% पेक्षा जास्त वाढ
या बातमीमुळे स्पाइसजेटच्या शेअर्समध्ये 3% पेक्षा जास्त वाढ दिसून आली. ते 1.द5 रुपये किंवा 3.47 टक्क्यांनी वाढून 31.30 रुपयांवर गेले. दरम्यान, मागील एका महिन्यात शेअर्समध्ये 15% घसरण झाली आहे. यावर्षी शेअर सुमारे 20% पडले आहेत. याचे 52 वीक लो 29.80 रुपये आणि 52 वीक हाय 62.30 रुपये आहे.
ही बातमीही वाचा...
आज शेअर बाजारात तेजी:सेन्सेक्स 140 अंकांच्या वाढीसह 59,131 वर उघडला, निफ्टीही 68 अंकांनी वधारला
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.