आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार्टअप ऑप्शन:फूड ट्रक व्यवसायाच्या रूपात सुरू करा व्हेंचर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंत युरोप आणि अमेरिकेत दिसणारे फूड ट्रकनी आता भारतातही रोडसाइड रेस्टॉरंट्सच्या रूपात आपली ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. फूड ट्रक सुरू करण्यासाठी रेस्टाॅरंटच्या तुलनेत खूप कमी गुंतवणूक लागते. सोबतच ग्राहकांच्या वर्दळीनुसार हे ट्रक आपली जागा बदलू शकतात, जसे की दुपारच्या जेवणाच्या वेळी एखाद्या कार्यालयाच्या बाहेर ट्रक उभे केले जाऊ शकतात. रात्रीच्या जेवणाच्या वेळेत एखाद्या गर्दीच्या किंवा पर्यटनस्थळी जाऊन सेवा देऊ शकतात. भारतात फूड ट्रक लहान, मध्यम आणि मोठे अशा तीन प्रकारांत तयार केले जातात. लहान फूड ट्रक टेम्पोच्या आकाराच्या वाहनात बनवले जातात. मध्यमसाठी मिनी ट्रकचा वापर केला जातो. मोठ्या फुड ट्रकसाठी मोठा ट्रक किंवा बसला मॉडिफाय केले जाते. आकारानुसार त्यातील गुंतवणूक ४ लाख ते २० लाखांपर्यंत असते. त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी दरमहा १० ते ३० हजार रुपये खर्च येतो. यात पेट्रोलसह सर्व्हिसिंग आणि किचनची देखभालही समाविष्ट आहे. रेस्टॉरंट्सकडून घेतले जाणारे परवाने फूड ट्रकसाठीही घ्यावे लागतात. यात फायर एनओसी, नगरपालिका, महापालिकेची एनओसी, व्यापार करण्यासाठी परवाना, जीएसटी, अन्न सुरक्षा परवाना आणि वाहनासाठी आवश्यक फिटनेस प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्सचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...