आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Startups Start At 3,500 In Gujarat, Business Diversifies By 10%, Results In Corona Lockdown Business Growth Helps Youth Startups

स्टार्टअप:गुजरातमध्ये 3,500 वर स्टार्टअप सुरू, 10 %नी व्यावसायिक वैविध्य साधले, कोरोनातील परिणाम लॉकडाऊनच्या व्यवसाय वृद्धीने तरुणाईने स्टार्टअपची मदत घेतली

अहमदाबाद ( मंदार दवे)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुजरात आणि राजस्थानमध्ये क्लाऊड किचनचा व्यवसाय ४००% वाढला, तरुणाई व्यवसाय निवडतेय
  • स्टार्टअप : गुजरात सरकारकडून 100 कोटींच्या निधीची घोषणा
  • बहुतांश स्टार्टअप पीपीई किट, मास्क, सॅनिटायझेशन ग्लोव्हज, रोगप्रतिकारशक्ती वृद्धी, अन्न-दागिने श्रेणीत

कोरोना काळात बहुतांश तरुणाई नोकरीऐवजी स्टार्टअप सुरू करू इच्छित आहेत. ते औषधी, पीपीई किट, हातमोजे, मास्क, टॉवेल, रोगप्रतिकारशक्ती बुस्टर, अन्न, दागिने यासारखे उत्पादन तयार करण्याशिवाय घर स्वच्छता, निर्जंतुकीकरण, वाहन, अभियांत्रिकी, कंपोनंट आदी क्षेत्रांत काम करत आहेत. भारत स्टार्टअप सुरू करण्याच्या प्रकरणात जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्येही गुजरात अव्वल आहे. देशात सलग १५,००० नोंदणीकृत स्टार्टअप आहेत. यापैकी ७६४ गुजरातमध्ये आहेत. दुसरीकडे, देशात ३० ते ३५ हजार स्टार्टअप अनोंदणीकृत आहेत. गुजरातमध्ये ही संख्या ४ हजारांपेक्षा जास्त आहे.

कोरोना काळात राजकोट, अहमदाबाद आणि सुरतमध्ये अनेक स्टार्टअप सुरू झाले आहेत. कोरोना महारोगराई पसरण्याआधी सुरू असलेल्या ७०% स्टार्टअपला वित्तीय संकटाचा सामना करावा लागला आहे. १५-२०% स्टार्टअप्सनी आपला व्यवसाय बंद केला आहे. उर्वरित १० टक्क्यांनी मागणीनुसार व्यवसाय बदलला आहे. स्टार्टअप अॅडव्हायझरी फर्म एंटरप्रायजिंग इंडियनचे संस्थापक भावेश उपाध्याय यांनी सांगितले की, वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी १३ मे रोजी एमएसएमईची व्याख्या बदलण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत ५ कोटी रुपये ते १०० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असणाऱ्या उद्योगास स्टार्टअप मानले गेले. गुजरात सरकारने स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नुकतीच १०० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली होती. याअंतर्गत ६००-७०० स्टार्टअप्सनी वेगवेगळ्या २०० प्रकल्पांवर या फंडाचा लाभ घेतला. फुज्जी क्लाऊड किचनचे संस्थापक करण शहा म्हणाले, लॉकडाऊनमध्ये क्लाऊड किचनला सर्वाधिक फायदा झाला.

  • हे विभाग फायद्यात

एनर्जेटिक ड्रिंक्स, प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या प्रोटीनच्या मागणीत वाढ

  • यांच्यात अडचणी

किरकोळ व्यवसाय, एफएमसीजी, वाहन, कम्पोनंट व अभियांत्रिकी

रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी प्रोटीन पावडर व एनर्जेटिक ड्रिंक्सची मागणी वाढली आहे. आम्ही प्रोटीन पावडर बनवत आहोत. लवकरच मल्टी व्हिटॅमिन टॅब्लेट व व्हिटॅमिन सी आधारित झिंक सल्फेट टॅब्लेट बाजारात येतील. -विरल पटेल, संचालक, गोल्डन लाइफ केअर, अहमदाबाद

बातम्या आणखी आहेत...