आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SBIकडून ग्राहकांना मोठी भेट:घर खरेदी करणाऱ्यांसाठी गृहकर्जावर जबरदस्त ऑफर, बँक प्रक्रिया शुल्कही माफ

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशी आहे एसबीआयची खास ऑफर

दिवाळीला तुम्ही जर नवीन घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी विशेष दिवाळी ऑफर आणल्या आहेत. स्टेट बँकेकडून गृहकर्ज दरात 0.25 टक्के सूट दिली जात आहे. तसेच यासाठीचे लागणारे प्रक्रिया शुल्क देखील आकारले जाणार नाही. एसबीआयमध्ये गृहकर्ज घेण्यासाठी सुरवाती वार्षिक व्याजदर 6.90 टक्के आहे. हा व्याज दर 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर लागू होतो.

काय आहे एसबीआयची खास ऑफर ?

– एसबीआयमध्ये सुरवाती गृहकर्जावर 6.90 टक्के व्याज दर मिळणार – सणासुदीत बँक व्याज दरावर 0.25 टक्के सवलत मिळेल – प्रक्रिया शुल्क 100 टक्के माफ केले जाईल – योनो (YONO) अॅपवरून अर्ज घेतल्यावर खास सवलती मिळणार आहेत.

एसबीआयच्या गृह कर्जावर ग्राहकांना 75 लाख रुपयांपर्यंतच्या घर खरेदीसाठी 0.25% व्याज सवलत मिळणार आहे. ही सूट सीआयबीआयएलच्या स्कोअरवर आधारित असेल आणि योनो अॅपद्वारे अर्जावर उपलब्ध असणार अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...