आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • State Business Reform Action Plan 2019 Ranking : Andhra Pradesh Tops The List, UP Is Second And Maharashtra At 13th.

दिव्य मराठी विशेष:व्यवसायासाठी सर्वाधिक सवलती देणाऱ्या राज्यांत आंध्र प्रदेश अव्वल, यूपी दुसऱ्या तर महाराष्ट्र 13 व्या क्रमांकावर

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्टेट बिझनेस रिफॉर्म अॅक्शन प्लॅन-2019 ची क्रमवारी जारी

केंद्राने शनिवारी स्टेट बिझनेस रिफॉर्म अॅक्शन प्लॅन-२०१९ (बीएआरपी) क्रमवारी जाहीर केली. यात भारताला स्वावलंबी करण्यासाठी व्यवसायातील सुधारणा प्रक्रियेत देशातील राज्य सरकारे काय प्रयत्न करत आहेत हे स्पष्ट झाले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही क्रमवारी जाहीर केली. यात आंध्र प्रदेश तिसऱ्यांदा अव्वल, तर महाराष्ट्र १३ व्या स्थानी आहे.

बीआरपीची ही चौथी क्रमवारी आहे. २०१२ मध्ये १२व्या स्थानी असलेले उत्तर प्रदेश यंदा दुसऱ्या स्थानी असून तेलंगण दुसऱ्यावरून तिसऱ्या स्थानी आले आहे. व्यावसायिक सुधारणा लागू करण्याच्या दृष्टीने आंध्र व उत्तर प्रदेश सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यात यशस्वी ठरले. यंदाची ही क्रमवारी पूर्णपणे युजर्स फीडबॅकच्या आधारे दिली आहे. विविध १८० निकषांच्या आधारे ३५ हजारांहून अधिक फीडबॅक घेऊन ही क्रमवारी जाहीर झाली. हा निकाल मार्चमध्येच जाहीर केला जाणार होता. परंतु, कोरोना महामारीमुळे यास सहा महिने विलंब झाला. यंदा राज्यांना विभागनिहाय क्रमवारी देण्यात आली आहे.

देशाच्या व्यवसाय सुलभतेच्या रँकिंगमध्ये सुधारणा होईल

डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेडने २०१५ मध्ये राज्यांत व्यापारी सुधारणांसाठी कृती आराखडा तयार केला होता. जेणेकरून राज्यांचे या दिशेने मूल्यांकन करून त्यांची तुलना करता येईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, राज्यांत रँकिंगच्या स्पर्धेमुळे देशाच्या एकूण व्यवसाय सुलभता रँकिंगमध्येही सुधारणा होईल.