आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • States Like Rajasthan, Chhattisgarh Will Not Get GST Compensation, As The Increase Is Less Than 14%

नवी दिल्ली:राजस्थान, छत्तीसगढसारख्या राज्यांना मिळणार नाही जीएसटी भरपाई, कारण14%पेक्षा कमी वाढ

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन सलग सहाव्या महिन्यात १.४० लाख कोटीपेक्षावर राहिले. मात्र एका डझनपेक्षा जास्त राज्यांनी चांगली कामगिरी केली नाही फक्त २३ राज्य आणि केंद्र शासित प्रदेश (यूटी)मध्ये जीएसटी संकलन १४% किंवा त्यापेक्षा जास्त वाढले. याचा अर्थ केंद्र राजस्थान, छत्तीसगढ आणि हिमाचल प्रदेशसारख्या इतर राज्य आणि युटीला महसूलातून नुकसान भरपाई देणार नाही. खरं तर, संरक्षित जीएसटी महसूल कालावधी ३० जून रोजी संपला. यानंतर, अशा राज्यांना केंद्राकडून भरपाई मिळणार नाही, ज्यांचे जीएसटी संकलन मागील वर्षीच्या याच महिन्यापेक्षा १४% किंवा त्यापेक्षा जास्त नसेल. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आकड्यानुसार, आॅगस्टमध्ये १४ राज्य आणि युटीचे जीएसटी संकलन १४% पेक्षा कमी वाढले. यांना ऑगस्टमध्ये केंद्राकडून कोणतीच भरपाई मिळणार नाही.

महाराष्ट्रात सर्वात जास्त संकलन, मोठ्या राज्यात राज्य ऑग.-21 ऑग.-22 वाढ महाराष्ट्र 15,175 18,863 24% चंडीगड 144 179 24% बिहार 1,037 1,271 23% मध्य प्रदेश 2,438 2,814 15% छत्तीसगढ़ 2,391 2,442 2%

काही राज्यांत ७८ टक्क्यापर्यंत दिसली वाढ मिझोरममध्ये जीएसटी संकलन वार्षिक आधारावर सर्वात जास्त ७८% वाढले. या प्रकरणात ३८% वाढीसह लद्दाख दुसऱ्या क्रमांकावर होते. मोठ्या राज्यात कर्नाटक, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये २९% पर्यंत वाढ दिसली.

बातम्या आणखी आहेत...