आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमॉडिटी आढावा:दोन महिन्यांत स्टील 13.5 टक्क्यांनी स्वस्त, घरांच्या किमती सध्या तरी वाढणार नाहीत; पावसाळा संपल्यामुळे बांधकामांना पुन्हा गती

रायपूर/अहमदाबाद2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोहखनिजांच्या किमती घटल्याने पोलादाच्या किमती परतल्या वर्षभराच्या जुन्या पातळीवर

गेल्या तीन महिन्यांत स्टीलच्या किमती १३.५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. जूनमध्ये पाेलादाची किंमत प्रतिटन ५२,००० होती. आता ती प्रतिटन ४५,००० रुपयांवर गेली अाहे. पुढील एका महिन्यात ही किंमत ४२ हजार रुपये प्रतिटनापर्यंत येऊ शकते. काेराेना महामारीमुळे लादण्यात अालेल्या निर्बंधांचा बांधकाम व्यवसायावर विपरीत परिणाम झाला हाेता. ही किंमत कमी झाल्यास त्याचा बांधकाम क्षेत्राला फायदा होईल, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले अाहे. पाेलादाच्या किमती कमी झाल्यामुळे स्थावर मालमत्ता विकासकांवर कच्चा माल महागण्याचा ताण काहीसा कमी झाला अाहे.

सणासुदीचा हंगाम लक्षात घेता सध्या तरी घरांच्या किमतीत वाढ हाेण्याची शक्यता नाही. परंतु पुढच्या वर्षात या किमती १०-१५ % वाढू शकतात, अशी शक्यता विकासकांनी व्यक्त केली अाहे.एमएमडीसीने या महिन्यांत लाेह खनिजाच्या किमती टनामागे २ हजार रुपयांनी कमी केल्या अाहेत. काही महिन्यांपूर्वी लाेह खनिजाच्या किमती प्रतिटन १५-६ हजार रुपयांवर गेल्या हाेता. अाता त्यात ३१ टक्क्यांनी घसरून प्रतिटन ११ हजार रुपयांच्या पातळीवर अाल्या अाहेत. त्यामुळे उत्पादकांना थाेडा दिलासा मिळाला अाहे.

यामुळे पाेलादाच्या किमतीत दिलासा

  • प्रदूषणकारी पोलाद कंपन्यांसाठी चीन सरकारच्या कडक धाेरणामुळे येथे लोहखनिजाची मागणी कमी झाली.
  • लोह खनिज स्वस्त होत आहे, पाेलादाची किंमत प्रतिटन ५२,००० रुपयांवरून ४५,००० रुपये प्रतिटन झाली आहे.
  • चीनची सर्वात मोठ्या रिअल इस्टेट कंपनी दिवाळखाेर हाेण्याच्या भीतीमुळे चीनमध्ये मागणी कमी होण्याची शक्यता
  • आयात कमी झाल्यामुळे लोह खनिज प्रतिटन ११ हजार रुपये होते, दोन महिन्यांपूर्वी त्याची किंमत १६,००० रुपये

सणासुदीच्या काळात किमती वाढणार नाहीत
कोरोना महामारीनंतर रिअल इस्टेट क्षेत्रात बरीच सुधारणा झाली अाहे. परंतु त्यांना कच्च्या मालाच्या सर्वाेच्च किमतींचा भारदेखील सहन करावा लागत आहे. गेल्या दोन महिन्यांत स्टीलच्या किमती १३.५ टक्क्यांनी कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. सणांचा हंगाम जवळ आल्याने विकासक सध्या किमती वाढवणार नाहीत, परंतु पुढच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये किमती १०-१५% वाढू शकतात. -जक्षय शहा, राष्ट्रीय अध्यक्ष, क्रेडाई

बातम्या आणखी आहेत...