आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Steel industry back on track 90 plant started other industrial products gained momentum as steel production began

दिव्य मराठी विशेष :रुळावर परततोय स्टील उद्योग, 90% प्लँट सुरू; पोलाद उत्पादन सुरू झाल्याने अन्य आैद्योगिक उत्पादनांनी वेग पकडला

रायपूर, भिलाई, रांची (सतीश चंद्राकर, उमेश निवल, शशिकुमार)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील पोलादाच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त वाटा असणाऱ्या 2 राज्यांतून सुखद वार्ता

टाळेबंदीदरम्यान बंद पडलेले छत्तीसगड आणि झारखंडमधील पोलादाच्या कारखान्यांतील काम पुन्हा रुळावर येत आहे. भिलाई येथील सेलच्या प्लँटसह छत्तीसगडच्या ९०% स्टील कारखान्यांत काम सुरू झाले आहे. झारखंडमध्ये टाटा स्टील प्लँटसह विविध लहान-मोठ्या युनिटने काम सुरू केले आहे. स्टील कारखान्यांनी काम सुरू केल्याने अन्य औद्योगिक हालचालींनी वेग पकडला आहे. देशाच्या एकूण पोलाद उत्पादनांत एक चतुर्थांश हिस्सा या तीन राज्यांचा आहे, हे इथे उल्लेखनीय आहे. सरकारकडून जारी केलेल्या दिशानिर्देशानंतर छत्तीसगडमध्ये एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यापासून स्टील कंपन्यांनी उत्पादन सुरू केले होते. असे असले तरी, सर्व खासगी कंपन्या ५०% उत्पादन क्षमतेसह काम करत आहेत. छत्तीसगडमध्ये देशातील सर्वात मोठी स्टील कंपनी सेलचे सर्वात मोठे युनिट भिलाई इस्पात संयंत्रा(बीएसपी)सह सुमारे ६०० कारखाने आहेत. त्यात स्पंज आयर्न, फर्नेंस आणि रोलिंग मिलचा समावेश आहे. यामध्ये लहान खिळ्यापासून रेल्वे रुळापर्यंची निर्मिती होते. राज्यातील खासगी कंपन्यांमध्ये तयार ८०% उत्पादनांची विक्री अन्य राज्यांत केली जाते. महाराष्ट्र, दिल्ली, द. भारत, मध्य प्रदेश, ओडिशा, गुजरात आदी प्रमुख खरेदीदार राज्यांचा यात समावेश आहे. झारखंडमध्ये राज्य सरकारने २७ मेपासून उद्योगांसाठी उत्पादन सुरू करण्याची परवानगी दिली होती. यानंतर जमशेदपूर येथील टाटा स्टील प्लँटमध्ये ६०-७०% क्षमतेसह उत्पादन सुरू झाले आहे.

जूनमध्ये ८०% उत्पादन होईल

एप्रिलमध्ये आणि मे महिन्यात ५०% पेक्षा जास्त उत्पादन केेले.चीनसह अन्य देशांकडून मेपर्यंत ५ लाख टनांपेक्षा जास्त निर्यातीची ऑर्डर बुक केली आहे. नेपाळ आमचा व्यापार भागीदार आहे, तेथूनही ऑर्डर सुरू झाली आहे. या महिन्यात गेल्या महिन्याच्या या अवधीच्या तुलनेत ८० टक्के उत्पादन करू. - अनिलकुमार चौधरी, अध्यक्ष सेल

सरकारने वीज स्वस्त करावी

स्टील उद्योगांना सध्या ७.१० पैसे युनिट दराने वीज खरेदी करावी लागत आहे. हा दर ५ रुपये हवा. प्रत्येक प्लँटला विजेची एक किमान मागणी असते. आम्ही वीज वापर करो किंवा न करो, डिमांड शुल्क भरावेच लागते. ते माफ केले पाहिजे. - मनीष धुप्पड, सरचिटणीस, छत्तीसगड मिनी स्टील प्लँट असोसिएशन

लवकरच पूर्ण क्षमतेने होईल काम

गुंतवणूक नियंत्रणाच्या प्रयत्नांत तेजी आणण्यासोबत संयंत्रातून महसूल सुरू करण्याच्या नव्या उपायांवर काम केले जात आहे. सध्या फिजिकल डिस्टन्सिंग कायम राखण्यासाठी किमान आवश्यक मनुष्यबळासोबत प्लँटमध्ये उत्पादन सुरू होत आहे. लवकरच पूर्ण क्षमतेने काम सुरू करू. - अनिर्बान दासगुप्ता, सीईओ, भिलाई स्टील प्लँट

0